रस्ता नसल्याने गर्भवतेचासाठी चादरीची झोळ; पुराच्या पाण्यातून वाट काढली.. (सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी)देशाला स्वातंत्र्य मिळवून ७६ वर्ष पूर्ण झाली एकीकडे सरकार स्वातंत्र्याचा अमूर्त महोत्सव साजरा करत आहे असताना, दुसरीकडे आदिवासी पाड्यात रस्त्यांची दुरवस्था आहे नदीवर पुल नाही, कुठे आरोग्यवस्थेचा बोजवारा अशी परीस्थिती आज ही दिसून येते आहे.अक्राणी तालुक्यातील खुटवडा गावांमध्ये रस्ते व काही ठिकाणी पुलांचे बांधकाम अर्धवट असल्याने स्थानिक लोकांना अनेक अडचणी येत आहेत. गावांमध्ये पक्का रस्ता नसल्याने कारणाने शालेय शिक्षण उच्च शिक्षणासाठी आणि गरोदर महिलांना प्रस्तुतीसाठी व प्राथमिक उपचारांसाठी तालुका रुग्णालयात धडगाव याठिकाणी घेऊन जावे लागले. सदर रस्ता अक्षरांची तालुक्या पासून १७ किलो मीटर एवढे अंतर असुन एम.एस.एच. किलो ७.५ किलो अंतर ४ वर्षा अगोदर रस्ता मंजुर होऊन सुध्दा रस्त्याचे कामाची सुरुवात अद्यापपही झाली नसुन स्थानिक लोकांना अनेक समस्या उद्भवत आहेत. किसन पावरा (वय ३८) यांच्या पत्नी सौ.गंमली पावरा (वय३४) मु.खुटवडा (कुडब्यापाडा) तालुका अक्राणी उपचारादरनंतर घरी झोळीत घेऊन जाताना.

Previous Post Next Post