कै.एस.व्ही ठकार माध्य व कै नारायण खेडकर कनिष्ठ महाविद्यालय धडगांव येथे सेवापुर्ती समारंभ संपन्न... (सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी) वडगांव येथील कै एस व्ही ठकार माध्य व कै नारायण खेडकर उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रयोग शाळा परिचर श्री पंडीत नथ्यू शिवदे हे आपल्या नियत वयोमानानुसार आज रोजी सेवा निवृत्त झाले ३५ वर्ष पूर्ण वेळ आपल्या सेवेचा काळ त्यांनी वेगवेगळ्या पदांवर कार्यरत राहुन सेवापूर्ती केली. माजी आमदार कै महाराज जनार्दन पोहल्या वळवी अध्यक्ष आदिवासी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ धडगांव संचलित कै एस व्ही ठकार विद्यालयात १२ वी पास झाल्यानंतर शिपाई या पदाची नियुक्ती दिली. पडीत शिवदे यांनी आपल्या प्रमाणिक कार्य करत शिक्षणिक पात्रात वाढवत प्रयोगशाळा परिचर पदापर्यंत कामकाज पाहिले जनार्दन विध्याश्रम शिक्षकांची सहकारी पतपेढी धडगांव येथे काही काळ संचालक पदाची धुरा त्यांनी सांभाळली आज रोजी कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य उमा पाडवी उपप्राचार्य रमेश वसावे प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर वृंद यांच्या तर्फे सेवापुर्ती निमित्त सपत्नीक महावस्त्र शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

Previous Post Next Post