ज्येष्ठ नागरिक महिला रेल्वे भाडे सवलत तसेच महाराष्ट्र मध्य प्रदेश राज्यासाठी भुसावळ इटारसी नागपूर फास्ट पसेंजर.सह पुणे गाडी सुरू करण्याचीरावेर खंडवा लोकसभा मतदारसंघात मागणी ****. प्रशांत बोरकर प्रवाशी नेते प्रदेश अध्यक्ष भारतीय किसान संघटन ***भुसावळ.*रावेर लोकसभा मतदारसंघात अनेक वर्षापासून रेल्वे स्टेशनवर थांबा ध्या म्हणून मागण्या प्रलंबित आहेत.तसेच अनेक रेल्वे गाड्या थांबे बंद झाले आहेत तसेच जेष्ठ नागरिक महिला यांचे प्रवाशी भाडे सवलत बंद केली आहे ती सुरू करण्याची मागणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते प्रवाशी नेते श्री प्रशांत बोरकर यांनी जाहीर केली आहे महाराष्ट्र राज्य मध्यप्रदेश राज्य मधे मुंबई पुणे नागपूर छत्रपती संभाजी नगर नाशिक भोपाल इटरशी यांना जोडणारी रेल्वे प्रवासी गाड्या सुरू करणे आवश्यक असल्याचे यावेळी श्री प्रशांत बोरकर यांनी सांगितलेत्याबाबत आपण गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत रेल्वे विभाग पासून रेल्वे महाप्रबंधक कार्यालयापासून रेल्वे मुख्यालय नवी दिल्ली रेल्वे बोर्ड कडे मागण्या पोहचल्या आहेतपरंतु लोकप्रतिनिधी लक्ष देत नसून त्यामुळे हजारो लाखो प्रवाशी जनतेची लूट कुचुंबणा होत असल्याची चर्चा आहे त्याबाबत तातडीने अंमलबजावणी करण्यात आली पाहिजे आणि बुऱ्हाणपूर रावेर येथे थांबण्याची गरज असल्याचे प्रतिपादन श्री प्रशांत बोरकर यांनी व्यक्त केले आहे.भारतातील सगळ्यात मोठा प्रवाशी वर्ग महाराष्ट्र प्रदेश मधे येत असतो. महाराष्ट्र मध्यप्रदेश राज्य मधील शेतकरी कामगार नोकरदार विद्यार्थी यांना प्रवास करण्यासाठी स्वतंत्र रेल्वे गाड्या सुरू झाल्या पाहिजेत असे अनेक वर्षापासून प्रवाशी चळवळीचे नेतृत्व करणारे श्री प्रशांत बोरकर यांनी सांगितले आहे .तसेच महिला वर्ग आणि जेष्ठ नागरिक यांची सवलत रेल्वे मोदी सरकारने बंद केली असून ती सवलत ही सुरू झाली पाहिजे आणि किमान निवडणूक जाहीरनामा मधे मागण्या समाविष्ट केल्या पाहिजेतअसेही श्री प्रशांत बोरकर यांनी जाहीर पाने मत व्यक्त केले आहे

Previous Post Next Post