अशोक प्राथमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णा भाऊ साठे जयंती साजरी. (राहुल दुगावकर उपसंपादक, नांदेड) कुंडलवाडी येथील अशोक प्राथमिक विद्यालयात 1 ऑगस्ट रोजी शाळेत लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. सदर या प्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते झाले.तदनंतर विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक, अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर भाषणाद्वारे प्रकाश टाकला तर शाळेचे मुख्याध्यापक श्री.राचूरे सर यांनी अध्यक्षीय भाषणात विध्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी तसेच समाज सेवक म्हणून कार्य करण्यासाठी महापुरुषांचे कार्य विस्तृत पणे सांगितले व जीवनात चांगल्या गोष्टी करण्याविषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात शाळेतील शिक्षक श्री.दुगावकर सर, शिक्षिका सौ.दासरवार मॅडम, महाजन सर, राठोड सर, भंडारे सर यांनी भाषणातून विद्यार्थ्यांना महापुरुषां विषयी व त्यांच्या जीवनातील संघर्षा विषयीचे विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.महाजन सर यांनी तर श्री.राठोड सर यांनी सूत्रसंचालन केले. या प्रसंगी शाळेतील सफाई कर्मचारी नीता दासतवार, शाळेतील विद्यार्थी व सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी मेहनत घेतली.
byMEDIA POLICE TIME
-
0