45 वयाच्या वरील नागरिकांसाठी शहादा येथे गीतगायन स्पर्धा;एक शाम किशोरकुमार के नाम, खोज शहादा के कलाकारोकी (नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) : येथील पटेल रेसिडेन्सी समोरील अन्नपुर्णा लॉन्स येथे दि. 04 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता स्वर्गीय गायक किशोरकुमार यांच्या जन्म दिवसानिमित्त एक शाम किशोरकुमार के नाम खोज शहादा के कलाकारोंच्या माध्यमातून भव्य गीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन संयोजकांनी केला आहे. आपल्या अवतीभवती असंख्य लोक असे आहेत ज्यांच्यामध्ये गाण्याची प्रचंड आवड असते. परंतु अशा लोकांना कधीही व्यासपीठ मिळत नाही. त्यामुळे घरीच किंवा आपल्या जवळच्या मित्राच्या मैफिलीत गणे गुंगुंतांना दिसत असतात. त्याच्या या कौशल्याला कधीच वाव मिळालेला नसतो. अश्या वयाने ज्येष्ठ असलेल्या शहाद्यातील "पंचेचाळीस वर्षावरील बाथरुम सिंगर्स" यांच्यासाठी एक गायनाचा आगळावेगळा उपक्रम शहादा के कलाकारच्या माध्यमातून होत आहे. 'दि लिजेंडरी गायक किशोरकुमार' यांचा जन्म दिवसानिमित्त 04 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता शहादा येथील अन्नपूर्णा हॉल मध्ये “एक शाम किशोरकुमार के नाम खोज शहादा के कलाकारोंकी"ची गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजक बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील, ज्येष्ठ बालरोग तज्ञ डॉ. प्रदिपकुमार पटेल, सामजिक कार्यकर्ते रविंद्र जमादार, माधव पाटील यांनी उपस्थितीचे आवाहन केले आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0