म.रा.पत्रकार संघाची सभा उत्साहात संपन्न..नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्य यांचे ग्रा.जिल्हाध्यक्ष हस्ते सत्कारर... रावेर तालुका ग्रामीण प्रतिनिधी - दि.5 विनायक जहुरे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ राचेर तालुका ची बैठक दि.4 रविवार रोजी सावदा रेस्ट हाऊस येथे तालुकाध्यक्ष रवींद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली..पत्रकार संघाचे संघटन ध्येयधोरणे सभासद बाढवणे व संघातर्फे समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात संदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी परिसरातील पत्रकार बंधु मोठ्धा संख्येने उपस्थित होते.पत्रकार हा केवळ पत्रकार म्हणूनच कार्य करत नाही तर समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळवून देण्याचा सतत प्रयत्न करत असतो.यावेळी पत्रकारावर होणारे अन्याय त्याचप्रमाणे समाजात होणारे अनुचित कार्य यास लगाम घालण्याचे कार्य करतो त्या अनुषंगाने रावेर तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या म. राज्य पत्रकार संघातर्फे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्याचे कार्य तसेच शेतकरी, शेतमजूर, नोकरदार या सर्वासाठी मार्गदर्शक ठरेल यानुसार पत्रकार संघाचे कार्य करावे व समाजात एक आदर्श निर्माण करावा असे यावेळी ठरवण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष नवले, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश सैतवाल ,सचिव इकबाल पिंजारी , नवनिर्वाचित ता.अध्यक्ष रविंद्र महाजन , सुमित पाटील, विनायक जहुरे, विजय अवरमल , माजी ता.अध्यक्ष प्रमोद कोंडे, राजेश चौधरी,प्रदीप कुलकर्णी,कैलास लवंगडे, संजीव चौधरी, किशोर परदेशी, रुपेश इंगळे, विजय के.अवरमल,प्रभाकर महाजन, सादिक पिंजारी, भूषण सोनवणे, पुरुषोत्तम सगपाल, यावेळी उपस्थित होते.सदर प्रास्ताविक इकबाल पिंजारी, विजय अवसमल घांनी तर आभाप्रदर्शन प्रा. दिलिप सोनवणे यांनी मानले.
byMEDIA POLICE TIME
-
0