आळेफाटा बस स्थानकावर कचऱ्याचे साम्राज्य ; प्रशासनाला कधी येणार जाग? (सुदर्शन मंडले ग्रामीण प्रतिनिधी जुन्नर पुणे) आळेफाटा (ता.जुन्नर ) येथे बसस्थानकात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात .आळेफाटा हे गाव नगर -कल्याण आणि पुणे - नाशिक या दोन महामार्गावर असलेले गाव आहॆ येथे चारही बाजूने रहदारी असणारी गाव मानले जाते .येथे शहरीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे येथे आजूबाजूच्या ठिकाणावरून लोक कामानिमित्त येत असतात बसस्थानकाच्या आसपास मोठ्या प्रमाणात मानवी वसाहती तसेच सोसायट्या झाल्याने कचरा मोठ्या प्रमाणात साठतो .ग्रामपंचायतच्या निष्काळजी मुळे येथे मोठ्या प्रमाणात कचरा साठला जातो व तो वेळेवर उचलला जात नाही परिणामी आजूबाजूच्या परिसरात घाणीचे साम्राज्य तयार होत आहे आणि यामुळे अनेक लोक आजारी पडतात तसेच तीन चार दिवस सतत चालणारा पाऊस यामुळे कचऱ्याची सड होऊन जास्त वास येथे आहे यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाश्यांना त्याचा त्रास होत आहे .प्रशासनानी याकडे लक्ष देणे गरजेचं आहे.

Previous Post Next Post