बिलोली ते पुणे व बिलोली ते केसराळी मार्गे देगलूर बस सुरू करण्याची मागणी... (दिपक केसराळीकर तालुका प्रतिनिधी बिलोली)बिलोली ते पुणे एसटी बस सेवा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे बिलोली चे आगार प्रमुख निम्मंनवाड यांच्या कडे केली आहे.बिलोली येथून सायंकाळी 5:30 वाजता पुण्याकडे धावणारी बस बिलोली-नरसी-मुखेड-लातुर-बार्शी इंदापुर-ते पुणे या मार्गे ती बस सकाळी 7 वाजता पुण्याला पहूचत असे व सायंकाळी पुन्हा याच मार्गे पुण्याहून बिलोलीच्या दिशेने येत होती. ही बससेवा बंद करण्यात आली. तेव्हापासून या मार्गावर बससेवा नसल्यामुळे या भागातील प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागते. यातून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. रात्रीच्या वेळी पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही बस सेवा महत्त्वाची होती. ही बससेवा बंद झाल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. "बहुजन हिताय बहुजन सुखाय" हे हे एसटीचे ब्रीद आहे. परंतु याचा विसर आगार प्रमुखाला पडला की काय? अशी चर्चा प्रवाशातून होताना दिसून येत आहे.त्यामुळे या मार्गावरील बससेवा पूर्ववत चालू ठेवावी,अशी मागणी वृद्ध,विद्यार्थी, नागरिक आणि महिलां प्रवाशाकडून होत आहे. ही बससेवा पूर्ववत चालु करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सय्यद रियाज, जेष्ठ पत्रकार ए.जी कुरेशी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक नासेर खान यांनी बिलोली आगार प्रमुख यांच्या कडे निवेदन देऊन केली आहे. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून बिलोली कार्ला फाटा-बोळेगाव-सगरोळी- हिप्परगाथडी-केसराळी- खतगाव ते आदमपूर मार्गे देगलूर ही बस सेवा गेल्या वीस वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे या परिसरातून तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. हा रस्ता तेलंगणा व कर्नाटक राजांना जोडणारा मुख्य रस्ता मानला जातो. त्यामुळे या रस्त्यावरून हजारो प्रवाशांची दररोज येजा चालू असते. बाजूच्या तेलंगणा राज्यातील बोधन आगाराचे चार बसेस या मार्गाने नियमित धावतात व देगलूर आकाराचे चार बसेस त्या मार्गाने धावत असतात. परंतु थेट तालुक्याच्या ठिकाणी बस सेवा नसल्याने दोन ते ठिकाणी चढ-उतार करून प्रवाशांना बिलोलीच्या ठिकाणी यावे लागते. म्हणून या मार्गे बस सेवा सुरू करण्यात यावी म्हणून अनेक वेळा हिप्परगाथडी, केसराळी,रामपूर थडी, दौलतापूर, खतगाव आदी गावातील नागरिकांनी आगार प्रमुखांना निवेदनेही दिली आहेत. आगार प्रमुखांनी ही बस सेवा नियमित चालू करण्यात येईल याबाबतचे आश्वासनही दिले होते. परंतु अद्याप पर्यंत ही बस सेवा सुरू झाली नाही. याबाबत बिलोली देगलूर मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी देखील आगार प्रमुखांना आदेश दिले होते. परंतु त्यांच्याही आदेशाला केराची टोपली दाखवत आगारप्रमुख आपला मनमानी कारभार करत आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही बस सेवा लवकरात लवकर चालू करण्यात यावी अन्यथा रास्ता रोको करण्यात येईल असा इशाराही नागरिकांनी दैनिक अधिकारनामा बिलोली तालुका प्रतिनिधी दिपक केसराळीकर त्यांच्याशी बोलताना दिला आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0