डॉ. विजय गोविंदराव कवडे (माजी जि.प. सदस्य यवतमाळ) यांची विविध समस्यासाठी अमरण उपोषणाचा इशारा (अजीज खान शहर प्रतिनिधी ढाणकी)एकीकडे देशाचे माननीय पंतप्रधान म्हणतात की, आज जगातील सर्व देश कमी विकास दर आणि मोठ्या महागाईच्या संकटाचा सामना करत आहेत. पण भारत हा एकमेव असा देश आहे जिथे विकास दर अधिक आणि महागाई कमी आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल. २०४७ मध्ये विकसित देश म्हणून आपण आपला १०० स्वातंत्र्यदिन साजरा करू असे असेल तर चांगली गोष्ट आहे. पण आज भारत देशाच्या महाराष्ट्रराज्या मध्ये यवतमाळ जिल्हा असलेल्या उमरखेड तालुक्यातील ढाणकी सह ग्रामीण भाग व बंदी भाग मधील समस्या पाहून हे न पटणारी गोष्ट वाटते .यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात ढाणकी येथे नागरिकांनी जन आक्रोश मोर्चा काडूनही,ढाणकी नगरपंचायत कडून पावसाळ्यात सुद्धा ढाणकी शहराला २० दिवसाआड नळाला पाणी सोडण्यात येते,ढाणकी येथे टेंमेश्वर नगर असून तेथील नागरीकांना अध्याप गाव नमुणा आठ मिळत नाही,ढाणकी शहरामध्ये अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य असून चिखलमय रस्ते दुरुस्त करण्यात आले नाही आणि अदयाप ढाणकी येथील मंजुर झालेले घरकुल लाभर्थी यांना लाभ देण्यात आला नाही .एवढेच काय यवतमाळ जिल्ह्यात अकोली गावा मध्ये लाजिरवाणी करणारी घटना घडली असून येथे एका महिलेला अंतिम संस्कार करण्यासाठी समशान भूमित नेण्यासाठी घुटण्याभर चिखलात तून वाट काढावी लागली,देशाची आर्थिक स्थिती मजबूत असताना मंग गाव खेड्यातील विकास का होत नाही? ज्वलंत उदाहरण बघायचे झाले तर यवतमाळ मधील उमरखेड तालुक्यातील बंदी भाग आहे.आज ही तेथे चांगले रस्ते, आरोग्यासाठी लागणाऱ्या औषध यांचा दवाखान्यात तुटवढा आहे आज ही तेथील तरुण बेरोजगार आहे. मंग भारत देश इतका आर्थिक मजबूत देश आहे तर हे समस्या का सुटत नाही?... एवढे प्रश्न या भागात आहे पण याचा निपटारा करण्यासाठी आज पर्यंत कोणताच लोकप्रतिनिधी पुढे आलेला नसून आज ढाणकी गावातील डॉ विजय कवडे पुढे सरसावले आहे त्यांनी या समस्या सोडविण्यासाठी,जिल्हाधिकारी यवतमाळ,एकनाथजी शिदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, नगरविकास मंत्री महाराष्ट्र राज्य,ग्राम विकास मंत्री महाराष्ट्र राज्य, मृद व जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य,अन्न पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य,उपविभागीय अधिकारी उमरखेड, तहसीलदार साहेब उमरखेड,गटविकास अधिकारी साहेब, उमरखेड, आणि ठाणेदार साहेब, पोलीस स्टेशन बिटरगाव यांना याबाबत निवेदन देऊन वरील मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अन्यथा दिनांक १० ऑगस्ट २०२४ पासून ढाणकी येथे अमरण उपोषणास बसणार आणि जिवीत्वास काही झाल्यास सर्वस्वी जबाबदार संबंधीत प्रशासन राहिल याचा इशारा दिला.
byMEDIA POLICE TIME
-
0