श्री साई कॉन्व्हेन्ट चे तीन खेळाडू बुध्दी बळ स्पर्धेत जिल्हा स्तरावर..... (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती चंद्रपूर)भद्रावती दि.7:-क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अ॑तर्गत जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय द्वारा आयोजित तालुका स्तरिय क्रिडा स्पर्धा स्थानिक यशंवतराव शिंदे इंडोअर हॉल येथे पार पडलेल्या या बुध्दीबळ स्पर्धेत येथील श्री साई कॉन्व्हेन्ट स्टेट चे 3 खेळाडू १४ वर्षा आतील मुलांच्या व मुलींच्यासऺघात जिल्हा स्तरावर निवड झाली आहे.यात मुलांच्या सऺघात सिध्दार्थ गोवर्धन वर्ग ७ वा तर मुलींच्या सऺघात वर्ग ६ ची खेळाडू कु.शाश्वती बडकेलवार ,वर्ग ७ ची कु.अवनी गोवर्धन या खेळाडू ची निवड झाली .या खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापिका कु. किरण कोथळे, मुख्याध्यापक अतुल बडकेलवार , रूपाली नंदनवार,,क्रीडा शिक्षक सुनील दैदावार, सुब्रोतो मिस्री , देवानंद जुमडे ,प्रिया डोर्लीकर, अर्चना बदखल,तथा आई आणि वडीलांना दिले आहे.या सर्व खेळाडूंचे अभिनंदन स॑स्थेचे सचिव प्रा. अतुल गुंडावार रूपा गु॑डावार यांनी केले.तसेच पुढील खेळाकरिता शुभेच्छा दिल्या.
byMEDIA POLICE TIME
-
0