लाडकी बहीण योजना : जिल्ह्यात 2 लाख 27 हजार महिला अर्जदार पात्र. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. )जिल्ह्यात 2 लाख 57 हजार 235 अर्ज प्राप्त; एकूण अर्जाच्या 88.22 टक्के अर्जदार पात्र; जास्तीत जास्त पात्र महिलांनी अर्ज करण्याचे आवाहन.परभणी : दि.07 मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला ग्रामीण व शहरी भागातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून परभणी जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 57 हजार 235 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनमध्ये 2 लाख 26 हजार 941 महिला अंतिमत: पात्र ठरल्या आहेत. त्यांची अंतिमत: 88.22 अशी टक्केवारी असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.या पत्रकार परिषदेला उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते,जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत खंदारे उपस्थित होते.जिल्ह्यातील प्रत्येक गावात आणि शहरी भागात अर्ज स्वीकृती केंद्र सुरु करण्यात आल्याने महिलांना या योजनेसाठी अर्ज करणे सोपे झाले आहे. ऑफ लाईन स्वरुपात प्राप्त झालेल्या अर्जांची ऑनलाईन नोंदणी करण्याला गती देण्यात आली असून जिल्हा स्तरावर याबाबतचा सातत्याने आढावा घेण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी गावडे यांनी सांगितले.ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामसेवक, रेशन दुकानदार, तलाठी, कृषि सहायक, महिला बचतगटाच्या समूह साधन व्यक्ती यांच्यामार्फत योजनेचे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. तसेच प्राप्त अर्जांची छाननी व ऑनलाईन नोंदणी करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. शहरी भागातही याच पद्धतीने विविध ठिकाणी अर्ज स्वीकृती केंद्रांच्या माध्यमातून महिलांचे ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 57 हजार 235 अर्ज प्राप्त झाले असून, केवळ 15 हजार अर्ज कागदपत्रां अभावी अंशत: दुरुस्ती साठी परत पाठविले आहेत. त्या अर्जातील कागदपत्रातील त्रुटी पूर्तता झाल्यानंतर ते ही पात्र ठरतील. शिवाय महिलांनी ऑफलाईन भरलेले अर्ज ऑन लाईन करणे, प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करुन अर्ज अंतिम करण्याची कार्यवाही गतीने सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना स्वतःचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा ‘नारीशक्ती दूत’ अॅपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरता येत नसलेल्या किंवा अर्ज भरताना तांत्रिक अडचण येत असल्यास ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी अर्जाचा नमुना व हमीपत्र याची पीडीएफ फाईल अॅपवर उपलब्ध आहे. या अर्जाची प्रिंट काढून त्याप्रमाणे अर्ज व हमीपत्र भरावे आणि ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्याकडे द्यावे. अर्जाचा विहित नमुना ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी येथे उपलब्ध आहे. तसेच या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, असेही जिल्हा धिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले.
byMEDIA POLICE TIME
-
0