अ.भा.ग्राहक पंचायती च्या जिल्हा सहसचिव पदी सुनील गायकवाड तर तालूका संघटक शुकाचार्य शिंदे. (शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधी परभणी.) सेलू : दि 9 ऑगस्ट अ. भा.ग्राहक पंचायतीच्या जिल्हास्तरीय समिती च्या प्रांताध्यक्षाच्या उपस्थितीमध्ये झाले ल्या बैठकीमध्ये सामा जिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांची जिल्हा सहसचिव तर तालुका कार्यकारणीवर शुकाचार्य शिंदे यांची तालुका संघटक म्हणून निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायत प्रान्त अध्यक्ष डाॅ.विलास मोरे यांच्या प्रमुख उपस्थिती त जिल्हाध्यक्ष गुलाब राव शिंदे व तालुकाध्य क्ष सतीश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा कार्य कारिणी निवड बैठकीत मागील दोन वर्षांपासून तालूका संघटक म्हणून अभिनंदनीय कार्य करणारे व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या प्रचार प्रसारासाठी अहोरात्र झटणारे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सुनील गायकवाड यांची जिल्ह्याच्या कार्य कारणी मध्ये जिल्हा सहसचिव या पदावर निवड करण्यात आली तर शैक्षणिक तसेच सामाजिक कार्यात सहभागी असणारे शुकाचार्य शिंदे यांची तालूका संघटक म्हणून निवड करण्यात आली. अ.भा. ग्राहक पंचायत चे जिल्हाध्यक्ष गुलाब राव शिंदे यांनी नवनिर्वाचित जिल्हा सहसचिव सुनील गायकवाड यांना निवडीचे पत्र दिले तर सेलू तालुका अध्यक्ष सतीश जाधव यांनी नवनिर्वाचित तालुका संघटक शुकाचार्य शिंदे यांना निवडीचे पत्र दिले. दोघा नवनिर्वा चित पदाधिकाऱ्यांना निवड झाल्याबद्दल प्रान्तअध्यक्ष डाॅ.विलास मोरे, जिल्हाध्यक्ष गुलाबराव शिंदे, तालुकाध्यक्ष सतीश जाधव, उपाध्यक्ष गंगाधर कान्हेकर, श्रीपाद रोडगे, सिद्धार्थ गायकवाड, अरूण आढे, शेख महेमुद, प्रशांत ठाकूर, नागोराव देशमूख, नागेश कान्हे कर, अंबादास ईघवे, सुरेंद्र पाटोळे, रघुनाथ देशमुख यांनी अभिनं दन केले आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0