राज ठाकरेंचा धावत्या दौर्‍यातून आढावानिवडणूक मोर्चेबांधणी व संघटनात्मक बांधणी संदर्भात हितगुज. (शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधी परभणी) . परभणी : दि.09 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी शुक्रवारी (दि.09) परभणीच्या दोन तासाच्या धावत्या दौर्‍यातून संघटनात्मक बांधणीसह आगामी विधानसभा निवडणू कीची मोर्चेबांधणी संदर्भात स्थानिक पदाधिकार्‍यांबरोबर हितगुज करीत आढावा घेतला.ठाकरे हे आप ल्या नियोजित दौर्‍या प्रमाणे शनिवारी परभणीत दाखल होणार होते. परंतु, ठाकरे यांच्या नियोजित दौर्‍यात काहीसा बदल झाला. त्याप्रमाणेे शुक्र वारी सकाळी 10 वाजता ते नांदेड मार्गे परभणीत दाखल झाले. तेव्हा वसमत रस्त्यावरील सावली या शासकीय विश्राम गृहावर ठाकरे यांचे स्थानिक पदाधिका र्‍यांनी जल्लोषात स्वागत केले. स्वागत सोहळ्यानंतर ठाकरे यांनी लगेचच स्थानिक पदाधिकार्‍यांबरोबर जिल्ह्यातील संघटना त्मक बांधणी संदर्भात चर्चा सुरु केली. त्या पाठोपाठ विधानसभा निहाय राजकीय स्थितीचा आढावा घेतला. मोर्चेबांधणी संदर्भातही काहीशा सूचना केल्या. ठाकरे व पदाधिकारी यांच्यात तब्बल दोन तास हे गुफ्तगु सुरु होते. त्या वेळी ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हेही या चर्चेत सहभागी होते राज ठाकरे यांनी दोन तासाच्या धावत्या आढावा बैठकीनंतर बीडकडे प्रस्थान केले. तत्पूर्वी माध्यमांच्या प्रतिनिधींनी ठाकरे यांच्याबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपण छत्रपती संभाजी नगरात एकूण दौर्‍या संदर्भात माध्यमांशी बोलणारच आहोत, असे स्पष्ट करतेवेळी आपला दौरा संघटनात्मक बांधणी सह मोर्चेबांधणी संदर्भात आहे, असे स्पष्ट केले.दरम्यान, ठाकरे यांच्या आगमना च्या पार्श्‍वभूमीवर स्था निक कार्यकर्त्यांनी सावली या शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वागताचे होर्डिंग्ज उभारले होते. वसमत व जिंतूर रस्त्या वरील मोक्याच्या ठिका णचेही हे होर्डिग्ज लक्ष वेधी ठरले.

Previous Post Next Post