जगन्नाथ मंडळातर्फे जागतीक आदिवासी दिवस उत्सवास साजरा...., (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती चंद्रपूर) भद्रावती दि.9:-प्रथा परंपरा रूढी बोलीभाषा वेशभुषा बाबत नागरी समुदायपेक्षा वेगळेपण जपणारा खरा निसर्ग पूजक आदिवासीं समुदाय असून तोच जागतिक संस्कृती चा मूळाधार असल्याचे इतिहासकार मानतात. हि संस्कृती व इतिहास पुढील पिढीला ज्ञात व्हावा म्हणून ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्याने स्थानिक गवराळा वॉर्ड येथील जय जगन्नाथ सेवानिवृत्त मित्र मंडळ इथे मोठ्या उत्सवात जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. ज्येष्ठ समाज बांधव नीलकंठ आत्राम ,पांडुरंग कोयचाडे सूर्यभान परचाके, ज्ञानेश्वर परचाके यांचे हस्ते विधिवत पूजन व माल्यार्पण करन्यात आले. याप्रसंगी आदिवासी संस्कृती टिकविण्यासाठी आपण कटिबध्द असलो पाहिजे असे मत व्यक्त मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिमेश मानुसमारे यांनी तर आभारप्रदर्शन ज्ञानेश्वर परचाके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उद्धव निळे, राजू माडेकर बाबाराव निखाडे, प्रभाकर निमकर, बबन जीवतोडे शामराव खापणे, संजय डोये, महादेव उरकुडे इत्यादीनी सहकार्य केले.

Previous Post Next Post