रावेर येथील श्री व्ही एस नाईक महाविद्यालयात भुगोल विभागातर्फे जागतीक आदिवासी दिवस साजरा. (रावेर विभागीय कार्यालय प्रमुख सानिया तडवी ) दि.9:-प्रथा परंपरा रूढी बोलीभाषा वेशभुषा बाबत नागरी समुदायपेक्षा वेगळेपण जपणारा खरा निसर्ग पूजक आदिवासीं समुदाय असून तोच जागतिक संस्कृती चा मूळाधार असल्याचे इतिहासकार मानतात. हि संस्कृती व इतिहास पुढील पिढीला ज्ञात व्हावा म्हणून ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्याने भुगोल विभागामार्फत येथील भुगोल विभागाचे प्रमुख प्राध्यापक सी. पी गाढे सर, प्रा. एल.एम वळवी, सर प्रा. डी. वाय महाजन सर, आणि इतर विभागातील शिक्षक वर्ग यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन लाभले.जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. यांचे हस्ते विधिवत पूजन व माल्यार्पण करन्यात आले. याप्रसंगी आदिवासी संस्कृती टिकविण्यासाठी आपण कटिबध्द असलो पाहिजे असे मत व्यक्त मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री ब्रिजलाल पाटील यांनी तर, आभार प्रदर्शन जयेश बाळु पाटील यांनी केले. त्याचबरोबर सानिया हमीद तडवी हिने जागतिक आदिवासी दिनाविषयी भाषण दिले. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इत्यादीनी शिक्षकांनी सहकार्य केले.तसेच हा कार्यक्रम माननीय प्राचार्य डॉ. पी. व्ही. दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
byMEDIA POLICE TIME
-
0