श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र शिव चिदंबर मंदिर (मोकस बाग )कावड यात्रा...., (सुदर्शन मंडले ग्रामीण प्रतिनिधी जुन्नर) आळेफाटा (दि .०९) वडगाव कांदळी येथील मोकस बाग येथून चिदंबर स्वरूप प.पू भाऊंच्या कृपाआशीर्वादाने व वंदनीय ताईंच्या मार्गदर्शनानुसार कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे . क्षेत्र आळंदी(इंद्रायणी) ते श्री क्षेत्र मोकसबाग(कांदळी )असा मार्ग या कावड यात्रेचा असणार आहे.दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्ताने शिव चिदंबर महास्वामींचा इंद्रायणी जल तीर्थाने अभिषेक शनिवारी (दि .१० रोजी )दु.१२ वाजता श्री क्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे नंतर सोमवारी (दि .१२) रोजी पहाटे ६ वाजता कावड यात्रेचा समारोप जलाभिषेक होऊन कार्यक्रम संपन्न होणार आहे अशी माहिती ह.भ.प. रामदास महाराज मोरे यांनी दिली.

Previous Post Next Post