विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि स्वसंरक्षणासाठी कार्यशाळा संपन्न.. (वाडा विभागीय संपादक)रवाडा शहरतील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर येथे विद्यार्थ्यांसाठी आरोग्य आणि स्वसंरक्षण या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन, सायबर सुरक्षा, आरोग्य आणि वाहतूकीचे नियम या विषयांवरील तज्ञांनी मार्गदर्शन केले.रस्ते अपघात टाळण्यासाठी व वाहन योग्यरित्या चालवण्याची जबाबदारी हे प्रत्येक नागरिकाचे असून कोणत्याही विद्यार्थ्यांनी ट्रिपल सीट घेऊन दुचाकी चालवू नये याची जबाबदारी पालकांनी घेतली पाहिजे तसेच विद्यार्थ्यांनी कोणाच्याही दुचाकीवर ट्रिपल सीट बसू नये. तर रस्त्याने जाताना कोणती काळजी घ्यावी याबाबत वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मयुरेश अंबाजी यांनी केले.या कार्यशाळेसाठी एस.पी.कुलकर्णी (डायरेक्ट सेफ्टी डिपार्टमेंट महाराष्ट्र शासन-सेवानिवृत्त) पोलीस उपनिरीक्षक अंबाजी, तज्ञ मार्गदर्शक शर्मा, संतोष पटारे, महेश जाधव, सरचिटणीस विशाल कुलकर्णी, कोषाध्यक्ष जगदीश चित्ते, मुख्याध्यापक संजय महाजन, उपमुख्याध्यापिका अर्चना सुर्यवंशी पर्यवेक्षिका सुमन सूर्यवंशी, जीतेन्द्र पाटील,महेश जाधव आदी उपस्थित होते.

Previous Post Next Post