*व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व आरोग्य कार्डचे वितरण व शैक्षणिक किट वाटप*------------------------ (चाकुर प्रतिनिधी)--व्हॉईस ऑफ मीडिया चाकूर तालुक्याच्या वतीने १० वी, १२ वी उत्तीर्ण पत्रकार पाल्यांचा सत्कार समारंभ आणि पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी कै.प्रयाग अक्का कराड आरोग्य सुरक्षा कार्डचे वितरण व शैक्षणिक किट वाटप कार्यक्रम भाई किशनराव देशमुख महाविद्यालय येथे संपन्न झाला.यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मराठवाडा विभागीय अध्यक्ष विजयजी चोरडिया हे होते.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष संगमजी कोटलवार, प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक दत्तात्रयजी निकम,माजी कुलसचिव तथा प्राचार्य डॉ.सर्जेरावजी शिंदे, तालुकाध्यक्ष अॅड.विनोद निला, सरचिटणीस संग्राम वाघमारे व व्हाॅईस ऑफ मिडियाचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0