ग्रामपंचायत सोन बु. अंतर्गत माझी वसुंधरा अभियान.... (सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी) अक्राणी तालुक्यातील ग्रामपंचायत सोन बु. येथे माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत मा.एल.जे. पावरा,गटविकास अधिकारी मा.किरण गावित, विस्तार अधिकारी तथा संपर्क अधिकारी मा. योगेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक धडगांव यांच्या प्रमुख उपस्थित तसेच डॉ. रतीलाल पावरा, डॉ. सुभास पावरा, सौ.जयश्री पावरा, सरपंच बजरंग पावरा, उपसरपंच सुरेश पावरा, फकिरा दादा. वसंत पटले अशोक पावरा, ग्रामसेवक मगन पावरा, पोलीस पाटील अंगणवाडी सेविका आरोग्य कर्मचारी, रोजगार सेवक वनखात्याचे कर्मचारी आश्रम शाळेचे शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ यांच्या उपस्थित विविध मान्यवरांचे हस्ते वूक्ष लागवड करण्यात आले तत्पूर्वी अधिकारी यांनी उपस्थित ग्रामस्थांना ग्रामपंचायत सदस्य व विद्यार्थी यांना माझी वसुंधरा अभियान ५.० बाबत सविस्तर पणे मार्गदर्शन संपर्क अधिकारी गावित साहेब यांनी केले ग्रामसेवक अशोक पावरा यांनी माझी वसुंधरा अभियान राबविणे बाबत उपस्थितांची शपथ घेण्यात आली दारासिंग पावरा एपीओ यांनी सुत्रसंचालन केले मगन पावरा यांनी आभार मानले.
byMEDIA POLICE TIME
-
0