आज दिनांक 5/8/2024 रोजी मौजे निमड्या तालुका रावेर येथे महसूल पंधरवडा च्या निमित्ताने महसूल विभाग व कृषी विभाग रावेर यांचे मार्फत शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात आला. (पाल प्रतिनिधी पुनमचंद जाधव )महसुल पंधरवडा च्या निमित्ताने. याप्रसंगी रावेर तालुक्याचे तहसीलदार माननीय श्री.बी.ए.कापसे सर तसेच तालुका कृषी अधिकारी मा.श्री भाऊसाहेब वाळके यांनी मार्गदर्शन केले. सदरील महाराष्ट्र शासनाच्या महसूल पांधरवाडा अंतर्गत आदिवासी दुर्गम क्षेत्रात जातीचे दाखले व इतर शैक्षणिक दाखले देण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले. त्यात निंमड्या , गारखेडा ,गारबर्डी या गावांतील नागरिकांना जातीचे दाखले, डोमिसाईल सर्टिफिकेट इत्यादी वाटप करण्यात आले. तसेच कृषी मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्याच्या शेतात जाऊन ही पीक पाहणी अँप ची माहिती देण्यात येऊन पिक पाहणी अँप मध्ये कसे भरावे याबाबत मा. तहसीलदार साहेब यांनी मार्गदर्शन केले. तसेच इतर महसूल विभागाच्या शासकीय योजना बाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले. कृषी विभागाचे श्री अरुण इंगळे श्री चंद्रकांत माळी, श्री.जगदीश देशमुख,श्री.सचिन गायकवाड,श्री.सिकंदर तडवी हे उपस्थित होते. स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना, ठिबक सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना, शेतकरी मासिक, बीज प्रक्रिया ,ठिबक सिंचन , पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियान,इत्यादी कृषी विभागाच्या योजना सविस्तरपणे शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आल्या व त्यांच्याशी चर्चा करण्यात आली ,अशा तऱ्हेने महसूल पंधरवडा हा आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला. पंचक्रोशीतील आदिवासी बांधवांनी सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला...

Previous Post Next Post