भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे सेलुचे शहराध्यक्ष शेख दिलावर भाई यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.) सेलू :माजी आ. विजयराव भांबळे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन सेलू येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी मा.आ.विजयराव भांबळे साहेबांनी त्यांचे स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यात प्रामुख्याने अमीर लाला, निसार अन्सारी, अफरोज पठाण, जुनेद शेख, मोबिल अन्सारी, शेख चांद, अकबर शेख, इब्राहीम भाई, अझर सय्यद, राजूभाई, पवन पवार, विजय भय्या, अशोक बोराडे,राज भाई,अफरोज पठाण परवेज पठाण, नजीर शेख, शिवाजी जाधव, मतीन शेख मुस्ताक भाई, शैलेश जोगदंड, नवरुल्ला बेग तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी प्रवेश केला.यावेळी अशोक नाना काकडे, रघुनाथ बागल, रामप्रसाद पौळ, सचिन गाडेकर, बाबा भदर्गे, अशोक उफाडे आदी उपस्थित होते.

Previous Post Next Post