हुतात्मा अनंता लेवडे यांच्या स्मृतिदिना निमित्त शालेय साहित्य वाटप.(शिवाजी शिंदेजिल्हा प्रतिनिधी परभणी. ) सेलू : दि 5 ऑगस्ट सोमवार रोजी तालूक्यातील डिग्रस वाडी येथील मराठा आंदोलक अंनत सुंदरराव लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बलिदान दिवस साजरा करण्यात आला. हुतात्मा अनंत लेवडे यांच्या परभणी रोड वरील स्मारकास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी दत्ता सोळंके, ह.भ.प. प्रसाद महाराज काष्टे, पांडुरंग कदम, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, निर्मिक क्लासेस संचालक शुकाचार्य शिंदे, यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा आंदोल नात अनंत लेवडे यांनी 5 ऑगस्ट 2018 रोजी बलिदान दिले आणि आज मनोज दादा जरांगे यांचे आंदोलन सुरू असून मराठा आरक्षण आंदोलनात ज्या समाज बांधवांनी बलिदान दिले आहे, तरी या सरकारकडून आम्हाला अपेक्षित आहे की मराठा समा जातील युवकांचे बलि दान वाया जाउ देऊ नये.तसेच हुतात्मा अनंत सुंदराव लेवडे स्मृतिदिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथ मिक शाळा वाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी भगवान यादव सुरेंद्र इंगोले, गुलाब महाराज गाडेकर, बाळकृष्ण लेवडे, सुंदर महाराज लेवडे, ज्ञाने श्वर लेवडे, संतोष निर्वळ, बाबासाहेब निर्वळ, गणेश निर्वळ, महादेव होगे, मोहन यादव, माणिक होगे, प्रल्हाद लेवडे , नारायण परभने, अंजीराम गायकवाड, प्रल्हाद लेवडे, मुंजा लेवडे, अशोक लेवडे, माणिक होगे, अंकुश होगे, पवन नाईक, मोहन आठवले, प्रकाश सोनवणे, सुधाकर गाडेकर, पिंटू शेरे, पांडुरंग गायकवाड आदी समाज बांधव उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0