तहसील कार्यालय अक्राणी येथे महसूल दिन साजरा, (उदेसिंग पराडके ग्रामीण प्रतिनिधी अक्राणी)अक्राणी: तहसील कार्यालय अक्राणी येथे महसूल दिन साजरा करण्यात आला या वेळी तहसिलदार राहुल मोरे यांनी महसूल दिनानिमित्त शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजना विषयी लोकांना मार्गदर्शन केले जसे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना , व महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन कल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविल्या जाणार आहे, या उपक्रमांतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमतावाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्य बळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील, या प्रकारे या आजच्या कार्यक्रमात बेरोजगार तरुणांसाठी विविध प्रकारच्या योजना विषयी तहसिलदार अक्राणी यांनी मार्गदर्शन केले, या वेळी उपस्थित तहसिलदार राहुल मोरे , नायब तहसिलदार, पुरवठा निरीक्षक हितेश ढाले , अजय पावरा पुरवठा निरीक्षक, अझर नाना, मंडळ अधिकारी, तलाठी, तसेच अक्राणी तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0