विद्यार्थ्यांनी ध्येय प्राप्तीसाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक- डॉ. सुनिता दीक्षित ( देशपांडे) यांचे प्रतिपादन. ( शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.) नूतन कन्या प्रशाला वर्धापन दिन व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ 2024.सेलू :विद्यार्थ्यांनी यश प्राप्तीसाठी ज्ञाननिष्ठा, गुरुनिष्ठा ,अध्ययननिष्ठा एकाग्रता चतु:सूत्रीचा नेहमीच वापर करावा. विद्यार्थ्यांना गुरुजनां प्रती नेहमीच आदर असावा. नम्रता अंगी असावी. ध्येय मोठे ठेवावे आणि ध्येयप्राप्तीसाठी नेहमीच प्रयत्नशील असावे." असे प्रतिपादन डॉ. सुनिता दीक्षित( देशपांडे) यांनी केले. दि.01 ऑगस्ट 2024 श्रीमती लक्ष्मी बाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला व श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल उच्च माध्यमिक विभाग गुणवंत विद्यार्थिनी सत्कार सोहळा प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ.सुनीता दीक्षित बोलत होत्या.कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी डॉ. सौ.सुनिता दिक्षित (देशपांडे) एम.बी.बी.एस.,एम.डी.(पॅथाॅलाॅजी) नांदेड, संस्थेचे चिटणीस प्राचार्य डॉ.व्ही.के. कोठेकर,शालेय समितीचे अध्यक्ष नंदकिशोरजी बाहेती, कार्यकारी मंडळाचे सदस्य दत्तरावजी पावडे,मकरंदजी दिग्रसकर,राजेशजी गुप्ता, डॉ.शरद कुलकर्णी,अजीजखाॅ पठाण, प्रशालेच्या मुख्याध्यापिका निशा पाटील,उपमुख्याध्या पक दत्तराव घोगरे ,पर्यवेक्षक रोहिदास मोगल, माता पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा माधुरी देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात विद्येची आराध्य देवता सरस्वती,लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने झाली.कार्यक्रमाचे स्वागतगीत संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे यांनी गायले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ.निशा पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सुहास देऊळगावकर यांनी दिला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या डॉ. सुनीता दीक्षित यांचा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायणजी लोया यांच्या हस्ते शाल, श्रीफळ ,पुष्पहार ,पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह, अमृतायान ग्रंथ आणि तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. प्रशालेतील इयत्ता 10 वी,12वी, स्पर्धा परीक्षा यातील गुणवंत विद्यार्थिनींचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यादी वाचन उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, कैलास मलवडे,सुरेखा आगळे, सीमा सुक्ते,वैशाली चव्हाण,ज्योती कुंभकर्ण,यशवंत कुलकर्णी,सपना पाटणी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कीर्ती राऊत यांनी केले तर आभार भालचंद्र गांजापूरकर यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. सुनीता दीक्षित यांनी अतिशय सुंदर गीत गात कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमा साठी प्रशालेतील गुणवंत विद्यार्थिनी,पालक, प्रशालेतील सेवानिवृत्त शिक्षक यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीते साठी प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post