आमदार राजेश पाडवी यांच्या तर्फे मतदार संघातील भजनी मंडळींसाठी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन... (कैलास शेंडे जिल्हा प्रतिनिधी नंदुरबार)नंदुरबार:भजन स्पर्धेच्या माध्यमातून देव देश धर्माचा जागर करणाऱ्या कलावंतांचा सन्मान, सत्कार व्हावा यासाठी आ. राजेश पाडवी यांच्या संकल्पनेतून शहादा तळोदा मतदारसंघातील भजन मंडळींसाठी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा शहादा येथील नाभिक समाज मंगल भवन येथे दिनांक १२ ऑगस्ट वार सोमवार रोजी सकाळी १० वा. आयोजित करण्यात आली आहे. आमदार राजेश पाडवी व कै. कलावती पाडवी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा केवळ शहादा तळोदा मतदार संघातील भजन समूहांकरिता असेल. यावेळी प्रथम पुरस्कार ५१०००/-, द्वितीय ३१०००/- तृतीय पारितोषक २१०००/-, उत्तेजनार्थ ५०००/- उत्कृष्ट हार्मोनियम वादकः १००१/-, उत्कृष्ट गायकः- १००१/- उत्कृष्ट तबलावादकः १००१/-, उत्कृष्ट झांज वादक :- १००१/-, उत्कृष्ट राग सादरीकरणः ५०१/-, तसेच भजन मंडळात शासनाकडून मानधन मिळवून देण्याकरिता स्पर्धेच्या ठिकाणी आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, बँक पासबुक झेरॉक्स, रेशन कार्ड ई. कागदपत्र आणणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी तळोदा येथे नारायण ठाकरे, दारासिंग वसावे, दरबार पाडवी, अक्षय जव्हेरी, शहादा येथे दीपक जयस्वाल, गोपाल पवार, अनिल ठाकरे यांच्याशी संपर्क साधावा. भजन संघातील सर्व मंडळी शहादा तळोदा मतदार संघातील असावी. कोणत्याही कलाकारास एकच संघातून सहभाग दर्शवता येईल. सादरीकरणाची वेळ तिस मिनिटे राहील. आयोजक व तज्ज्ञ परिक्षक यांचा निर्णय अंतिम राहील . तसेच सर्व सहभागी कलावंतांना आकर्षक प्रमाणपत्र देण्यात येईल. तरी स्पर्धेत जास्तीत जास्त भजनी मंडळांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आमदार राजेश पाडवी यांच्यातर्फ करण्यात आले आहे.

Previous Post Next Post