खतगावात बाळुमामाची पालखी मोठ्या ढोलतासात साजरी. (आनंद कुरुडवाडे प्रतिनिधी रामतीर्थ सर्कल )खतगाव दि. 30एप्रिलबिलोली तालुक्यातील ग्राम खतगांव नगरीत श्री. संत सद्गुरू बाळू मामांची पालखी व 25.04.2025मेंढरांचा तळ मुक्कामी आला आहे. शुक्रवार रोजी सायंकाळी खतगांव नगरीत येऊन सह दिवस उलटले आहेत.खतगांव परिसरातील भाविक भक्तांची दर्शनास दररोज गर्दी होताना दिसून येत आहे. येथील सद्गुरू बाळूमामांची ही १२ व्या क्रमांकाची पालखी आहे. महाराष्ट्रात बाळूमामांच्या मेंढरांचे तब्बल १९ तळ ग्रामीण भागात विराजमान आहेत. सकाळ, संध्याकाळ आरती, महाप्रसाद अन्नदान व बाळूमामांनी आयुष्यात व्यतीत केलेल्या चमत्कारिक बाबींचे रसाळ विवेचनही ऐकायला मिळत आहे. तळा गळातिल अनेक सेवेकरी भक्तांचाही उत्तुंग मनोभावे सहभाग होत आहेत.या सदरील बग्गीचे कारभारी यशवंत भाऊ सुरनर बनवसकर हे आहेत. सोमवार दि.२८ एप्रिल रोजी सायंकाळपासून ते मंगळवार दि.२९ रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत बाळूमामांचा भार उतरवणे (अर्थात लक्ष्मीरूपी मेंढ्यांच्या लोकरीचे जावळ काञण) कार्यक्रम संपन्न झाले दररोज सकाळ संध्याकाळ महा प्रसादचा ककर्यक्रम व फुरणफोळी भंडारे झाले खतगाव व खतगाव नगरी जेष्ट श्री बाळासाहेब पाटील खतगावकर व खतगाव आणि परीसरातिल भाविक भंक्तांची खुप मोठी गर्दी होती् पालकी मोठ्या उस्तवात साजरी झाली

खतगावात बाळुमामाची पालखी मोठ्या ढोलतासात साजरी.                                                                    
Previous Post Next Post