बिजरी ते काकरपाटी दरम्यानच्या अपूर्ण अवस्थेतील रस्ता तात्काळ दुरुस्ती करा या संदर्भात मा नायब तहसिलदार अक्राणी यांना निवेदन. अक्राणी तालुक्यातील बिजरी ते काकरपाटी दरम्यानच्या अपूर्ण अवस्थेतील रस्ता हा अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे व वाहन धारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे.सदर रस्ता हा धडगांव ते तळोदा या दोन तालुक्यांना जोडणारा व जिल्ह्याला जोडणारा एकमेव मुख्य मार्ग असल्या‌ कारणाने वाहनांची मोठी वर्दळ असते, ठेकेदार व बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे या रस्त्याचे काम हे अपूर्ण अवस्थेत आहे.हा रस्ता दुरुस्ती करण्याचे काम कंत्राटदारांना देण्यात आले आहे.परंतु बिजरी ते काकरपाटी दरम्यान ज्या ठिकाणी जास्तच खड्डे पडले आहेत. त्याच ठिकाणी अपूर्ण अवस्थेत काम दिसून येत आहे. त्यामुळे वाहन धारकांमध्ये व प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला आहे या रस्त्यावरुन गरोदर महिला, वयस्कर व आजारी नागरिकांना प्रवास नको झाले असून प्रवाशी हैराण झाले आहेत. या रस्त्यावरुन प्रवास करतांना कोणत्याही ‌क्षणी अपघात होऊ शकतो. म्हणून तातडीने हा अपूर्ण अवस्थेतील रस्ता दुरुस्ती होणे अपेक्षित आहे. सदर निवेदन हे नायब तहसिलदार अक्राणी किसन गावीत यांना देण्यात आले असून निवेदन देताना अक्राणी तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.

बिजरी ते काकरपाटी दरम्यानच्या अपूर्ण अवस्थेतील रस्ता तात्काळ दुरुस्ती करा या संदर्भात मा नायब तहसिलदार अक्राणी यांना निवेदन.                                     
Previous Post Next Post