आडगाव येथील वाघ्याबर्डी सिंचन प्रकल्पाची केली अधिकाऱ्यांनी पाहणी ( अनेक गावासह शेतकऱ्यांना फायदा (कासोदा एरंडोल तालुका प्रतिनिधी केदारनाथ सोमाणी ) येथुन जवळचं असलेल्या आडगाव ता.एरंडोल येथील वाघ्याबर्डी सिंचन प्रकल्पकांची पाहणी उपविभागिय जलसंधारण अधिकारी मूर्णशा वैलचावला , जिल्हा जलसंधारण अधिकारी बाळकृष्ण ढंगारे , जलसंधारण अधिकारी नितीन राठोड , विशाल शिंदे यांनी भर उन्हात जाऊन प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली . या प्रकल्पासंदर्भात आडगाव येथील कृती समितीने तालुक्याचे माजी आमदार महेंद्रसिंग पाटील यांच्याशी भेट घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात आला होता . वरिष्ठाचे आदेश प्राप्त झाल्याने जलसंधारण अधिकारी यांनी ताबडतोब जाऊन वाध्याबर्डी जलसिंचन प्रकल्पाची पाहणी केली . या सिंचन प्रकल्पाचा आडगाव , कासोदा , उमरे , मालखेडा सह बऱ्याच गावांचा फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांमधे आनंदाचे वातावरण दिसून आले . हा प्रकल्प अनेक वर्षापासून विचाराधीन आहे .परंतू अमलबजावणी होत नाही . गिरणा सिंचन प्रकल्प असला तरी बऱ्याच शेतकरी वर्गाला फायदा होत नाही म्हणून वाघ्याबर्डी सिंचन प्रकल्प होणे गरजेचे आहे . कासोदा आडगाव परिसराला पिण्याच्या पाण्याची समस्या खूप मोठया प्रमाणावर आहे म्हणून या प्रकल्पाचा नक्कीच मोठा फायदा होणार आहे . मुख्यमंत्री महोदय यावर सकारात्मक निर्णय घेतील अशी आशा आहे . सिंचनाची पाहणी करतेवेळी शिष्टमंडळातील सरपंच सुनिल पवार , ग्रां प सदस्य प्रल्हाद पाटील , प्रविण पाटील , मार्केट कमेटी संचालक सुदाम पाटील ग्रा प सदस्य रविंद्र पवार , रावसाहेब पाटील . जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील , मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील चिलाणेकर उपस्थित होते . अधिकारी वर्गाने सकारात्मक भूमिका घेऊन शासनाकडे अहवाल लवकर पाठविला जाईल असे मत व्यक्त केले . शेवटी आभार प्रल्हाद पाटील यांनी मानले .
byMEDIA POLICE TIME
-
0