भुसावळ विभागातफायनान्सच्या माध्यमातून अनेक ग्राहकांची लूट आणि दुकानदारांची चांदी,मौज मस्ती,अवैध सावकारी. अनेकांच्या घरात प्रत्यक्ष वस्तू आढळून येणार नाही... यावल दि.२२( सुरेश पाटील) घरगुती कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी फायनान्स मंजूर झाल्यानंतर जी वस्तू ग्राहकाला देणे आणि घेणे क्रमप्राप्त होते ती वस्तू प्रत्यक्ष न घेता काही ग्राहक आणि दुकानदार तसेच फायनान्स कंपनीचा स्थानिक कर्मचारी हे आपापसात समन्वय साधून रोख रक्कम दुकानदाराकडून घेत असून किंवा ग्राहकांना वस्तू ऐवजी रोख रक्कम देऊन फायनान्स कंपनी प्रमाणे वैयक्तिक सावकारीचा व्यवसाय करायला लागल्याची व फायनान्सच्या माध्यमातून घेतलेल्या अनेक वस्तू अनेकांच्या घरात आढळून येणार नाही अशी चर्चा भुसावळ विभागात आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की भुसावळ विभागातील काही दुकानदार,शोरूम,एजन्सी मालक,चालक हे प्रसिद्धी माध्यमाद्वारे आणि प्रसिद्धी पत्रक वाटून घरगुती आवश्यक सामानाची वस्तूची विक्री वाढविण्यासाठी स्पर्धात्मक पद्धतीने मोठ्या प्रमाणात आपले व्यवसाय करीत आहेत.ग्राहकांना सहज वस्तू खरेदी करता यावी म्हणून आपल्या दुकानातून फर्म मधून मोबाईल,टीव्ही,स्मार्ट टीव्ही फ्रिज,लॅपटॉप,डीप फ्रीज,कूलर,मिक्सर,घरगुती आटा चक्की,इलेक्ट्रिक पंप,एसी,शिलाई मशीन,फॅन,कुकर डीव्हीडी,सीसीटीव्ही कॅमेरे,इन्व्हर्टर,इत्यादी अनेक वस्तू काही ठराविक डाऊन पेमेंट किंवा शून्य डाऊन पेमेंट वर फायनानच्या माध्यमातून विक्री करीत आहेत.परंतु यात अनेक काही हुशार चाणाक्ष,संधी साधणारे ग्राहक हे संबंधित एखाद्या दुकानदाराला, फायनान्स कंपनीच्या स्थानिक प्रतिनिधीला,विश्वासात घेऊन, समन्वय साधून कोणतीही एखादी महाग वस्तू खरेदी न करता त्या वस्तू ऐवजी दुकानदाराकडून रोख रक्कम घेऊन वैयक्तिकरित्या समाजात सावकारी करीत असल्याची चर्चा आहे या व्यवहारामध्ये काही दुकानदार मात्र रोख रक्कम घेणाऱ्यांकडून कागदोपत्री जी वस्तू घेत आहे त्याचे बनावट विक्रीचे बिल तयार करून ग्राहकाकडून जीएसटी,आयकर इत्यादी टॅक्स वसूल करून बाकीची रोख रक्कम त्या ग्राहकाला देत असतात,त्या हुशार ग्राहकाला रोख रक्कम मिळाल्यानंतर तो वैयक्तिकरित्या इतरांना व्याजाने ती रक्कम देऊन अव्वाची - सव्वा रक्कम गरजूंकडून वसूल करीत आहेत काही फायनान्स कंपन्यांनी ज्या दुकानदारांमार्फत ज्या वस्तूवर फायनान्स उपलब्ध करून दिला आहे ती वस्तू प्रत्यक्ष त्या ग्राहकाच्या घरी आहे किंवा नाही याची खात्री फायनान्स कंपनीने कधी केली आहे का..? आणि खात्री न केल्याने एखाद्या ग्राहकाने ईएमआय म्हणजे हप्ता नाही भरल्यास फायनान्स कंपनीला त्या ग्राहकाकडून ती वस्तू जप्त करता येत नसल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत त्यामुळे फायनान्स कंपन्यांनी काही दुकानदारांमार्फत ठराविक वस्तूंवर जो फायनान्स उपलब्ध करून दिला आहे त्या वस्तू प्रत्यक्ष ग्राहकाकडे आहे किंवा नाही याची खात्री केल्यास अनेक डीलर व दुकानदारांचे पितळ उघडे पडून त्यांनी जमा केलेली माया आणि आर्थिक चांदी आणि करीत असलेले मौज मस्ती उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही.. आणि या चौकशीसाठी काहींनी जीएसटी व संबंधित आयकर विभागाकडे विक्रीकर विभागाकडे संपर्क साधून रीतसर तक्रारी करणार असल्याची संपूर्ण भुसावळ विभागात चर्चा आहे.फायनान्स कंपन्या सुद्धा फायनान्स उपलब्ध केल्यानंतर एखाद्या ग्राहकाचा ईएमआय चुकल्यास त्याच्याकडून बँके मार्फतच वाजवीपेक्षा जास्त बेकायदा दंडात्मक रक्कम वसूल करून ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करीत असल्याचे संपूर्ण भुसावळ विभागात बोलले जात आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0