*जिल्हा पोलीस ,जिल्हाधिकारी,जिल्हा परिषद विरोधात आदिवासींचा २८ एप्रिलला जन आक्रोश मोर्चा**. जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक,मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या कारभाराबद्दल नाराजी!*. नंदूरबार प्रतिनिधी: नंदुरबार जिल्ह्य़ातील पोलीस प्रशासनाकडून आदिवासींवर होणा-या अन्याय अत्याचारांविरोधात, अवैद्य धंदे बंद करणे,मनमानी कारभाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार व जिल्हा परिषद नंदूरबार प्रशासनाविरोधात विविध प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२ वाजता नवापूर चौफूली ते पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार-जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार -जिल्हा परिषद नंदूरबार पर्यंत समस्त आदिवासी संघटना,आदिवासी समुदाय जिल्हा नंदूरबार तर्फे जन आक्रोश मोर्चा निघणार आहे.मोर्चाचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार, पोलीस अधीक्षक नंदूरबार , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार व पोलीस निरीक्षक, शहर पोलीस ठाणे नंदुरबार यांना देण्यात आले आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,भारतीय स्वाभिमानी संघाचे प्रदेश सचिव रोहीदास वळवी,भारतीय स्वाभीमानी संघाचे जिल्हाध्यक्ष पंकज वळवी,भारतीय स्वाभीमानी संघाचे तालुकाध्यक्ष अजय वळवी,बिरसा फायटर्स चे वनसिंग पटले,किसन वसावे,जयसिंग वसावे,जयसिंग वळवी,हाना पटले,माधव वसावे, योगेश गावित-सामाजिक कार्यकर्ते,राकेश वळवी- बिरसा आर्मी, रवींद्र वळवी-भारत आदिवासी संविधान सेना, जितेंद्र बागूल केंद्रीय अध्यक्ष विश्व आदिवासी संविधान संघटना इत्यादी विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.जन आक्रोश मोर्चात नंदूरबार जिल्ह्य़ातील सर्वच आदिवासी सामाजिक संघटनांनी,आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे,असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी आदिवासींच्या हडप केलेल्या जमिनींची चौकशी करण्यात यावी व त्यांचे विधानपरिषद सदस्यत्व रद्द करण्यात यावे.बिलीचापडा येथील वनदाव्यांचे वनपट्टे प्रमाणपत्र मिळावेत. ५ वर्षे फाईल्स दडपून ठेवणा-या हर्षल सोनार जिल्हा समन्वयक वनजमीन विभाग यांना सेवेतून काढा.लोकसभा व विधानसभा निवडणुकीत खुलेआम पैसे वाटणा-यांवर व तत्कालीन उपविभागीय अधिकारी सुभाष दळवींवर कारवाई करावी.दिपाली चित्ते यांचा चाकूने खून प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करा व संबंधित पोलीस अधिकारी ,सरकारी रूग्णालय शहादा येथील डाॅक्टर यांनाही सहआरोपी करा,कुलकर्णी रूग्णालय शहादा यांची मान्यता रद्द करा.केलापाणी,बिलगांव हेंद्यापाडा,शेलदा, अक्राणीमहल येथील आदिवासी बांधवांसाठी रस्ता,दवाखाना,पाणी,शाळा,अंगणवाडी ,वीज इत्यादी सोय तात्काळ करा.जिल्ह्य़ातील सर्व प्रलंबित वनदावे निकाली काढा.दोन पदांवर काम करून दोन पदांचे पगार/मानधन घेऊन शासनाची फसवणूक करणा-यांवर कडक कारवाई करा. दोन पदांवर काम करणा-यांना पाठीशी घालणा-या मा.उपायुक्त, मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास योजना नंदूरबार व जिल्हा परिषद नंदूरबार मधील शिक्षणाधिकारी प्राथमिक,आरोग्य अधिकारी,ग्राम विभाग प्रमुख ,अभियंता बांधकाम विभाग ज्यांनी आदेश दिलेत त्यांना सेवेतून निलंबित करा व दोन पदांवर दिलेले मानधन व पगार संबंधित विभाग प्रमुखांकडून वसूल करा.आदिवासी विकास विभागाचा निधी परत करा.शेतकऱ्यांचे १००% कर्ज माफ करावे. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नका.खोट्या जात प्रमाणपत्र धारक सरपंचांना पदावरून हटवा,५ पेक्षा अधिक अपत्य असणा-या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचे सदस्यत्व रद्द करा. जिल्ह्य़ातील रस्त्यांचे निष्कृष्ट काम करणा-या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका,भ्रष्टाचार करणा-या ठेकेदार व अभियंत्यांवर कायदेशीर कडक कारवाई करा. पोलीस निरीक्षक शहादा निलेश देसले यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ व सुधारित कायद्यानुसार ॲस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करा,चौकशी अहवालाच्या आधारे सेवेतून निलंबित करा,नंदूरबार जिल्हाबाहेर बदली करा.शहादा तालुक्यातील पिंपर्ळे येथील येथील कृष्णा वाघ या आदिवासी व्यक्तीस जातीवाचक अश्लील शिवीगाळ करीत पाईपने जबर मारहाण करणा-या व आदिवासी महिलांवर अन्याय अत्याचार करणा-या मराठा-गुजर समाजातील ॲस्ट्रासिटीच्या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करा.शहादा पोलीस ठाण्यात ड्यूटीवर असतांना विमल गुटखा खाणा-या पोलिसांना निलंबित करा.नंदुरबार जिल्ह्य़ातील सट्टा- मटका,जुगार, दारू,गुरखा,गांजा,असे अवैद्य व्यवसाय बंद करा.आंदोलन कर्ता दिलवर गोवाल पाडवी यांच्यावर धडगांव येथे हल्ला करणा-या ५ आरोपींना तात्काळ अटक करा. धडगांव तालुक्यातील मोडलगांव,जुगनी, भोगवाडे,बोरवण,चूलवड येथील ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराची चौकशी करा व भ्रष्टाचा-यांना पाठीशी घालणा-या श्री.एम .आर. भोसले गटविकास अधिकारी पंचायत समिती धडगांव यांना निलंबित करा. श्री.वी.पी.राठोड गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना सेवेतून निलंबित करा. गोपाल होनजी गावीत ,आदिवासी प्राथमिक यांच्यावर खोटे आरोप लावून अन्याय करणा-या संबंधितांना सेवेतून निलंबित करा. बोगस दिव्यांग शिक्षकांना सेवेतून काढा.सुनील नथा पाटील प्राथमिक शिक्षक यांना शिक्षक पदावर पाठवा. सुभाष मारणार सहाय्यक प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार शिक्षण विभाग यांची बदली करा. प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना वळवी यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत कार्यवाही करा. विद्यार्थांना १५ जून २०२५ रोजी मोफत गणवेश वाटप करण्यात यावा.आदिवासी विद्यार्थांसाठीची सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती योजना सुरू करा.अनुसूचित जमाती,अनुसूचित जाती व दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थांना उपस्थिती भत्ता १ रूपये वरून १० रूपये करा .शालेय पोषण आहारात विद्यार्थांना अंडी व इतर पोषण आहार द्या. या मागण्यांसाठी आदिवासींचा जन आक्रोश मोर्चा निघणार आहे.

जिल्हा पोलीस ,जिल्हाधिकारी,जिल्हा परिषद विरोधात आदिवासींचा २८ एप्रिलला जन आक्रोश मोर्चा**.           जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक,मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या कारभाराबद्दल नाराजी!*.                                   
Previous Post Next Post