खिर्डी येथील इलेक्ट्रिक पोलची समस्येला अखेर पूर्णविराम! दै.रोख ठोक न्यूज ची ... दखल.. खिर्डी/प्रतिनिधी _दि.25 विनायक जहुरेरावेर तालुक्यातील खिर्डी खु! येथे महावितरण कंपनी ने भर वस्तीत बाजार पट्यातील विद्युत प्रवाह असलेल्या इलेक्ट्रिक पोल ला दिला दोरीचा आधार या मथळ्याखाली दोन दिवसापूर्वी बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.सविस्तर वृत्त असे की गेल्या 15 दिवसापूर्वी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वाऱ्याने रावेर तालुक्यातील खिर्डी खु! येथील बाजार पट्टयातील लिंबाचे झाड पडून विद्युत इलेक्ट्रिक तार तुटले जाऊन पोल पूर्णपणे एका बाजूने वाकला गेल्याने त्याला काढून किंवा नवीन पोल न उभारता महावितरण कंपनीचे कर्मचारी व अधिकारी यांनी अजब शक्कल लढवली होती चक्क तुटलेल्या झाडाच्या खोडाला दोर बांधून त्याला आधार देण्याचं काम केले होते.यासंबंधी माहिती तथा बातमी प्रसिद्ध करत प्रतिनिधी यांनी मतदारसंघ चे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या पर्यंत पोहचून त्यांनी लागलीच त्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना देत महावितरण कंपनीने चे अधिकारी ठेकेदार यांना रहिवाश्यांना होत असलेल्या अडचण व धोका बाबत माहिती दिली.त्यानुसार त्यांनी तात्काळ दुरुस्ती व नवीन पोल उभारण्याचे कार्यवाही करून कामाला सुरवात केली.त्याबद्दल परिसरातील रहिवाशी/नागरिकांनी लोकप्रतिनिधी व पत्रकार यांचे कौतुक करत आभार व्यक्त केले.
byMEDIA POLICE TIME
-
0