*पाडळसे येथे संत भीमा भोई जयंती उत्साहात साजरी*. (पाडळसे (प्रतिनिधी) – आज पाडळसे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संत भीमा भोई जयंतीनिमित्त संत भीमा भोई व महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.या प्रसंगी गावातील सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन भक्तिभावाने करण्यात आले होते. संत भीमा भोई यांच्या विचारांचा गौरव करत उपस्थितांनी त्यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. महर्षी वाल्मिकी यांच्या स्मरणातून सामाजिक समरसतेचा संदेश देण्यात आला.या पूजन कार्यक्रमातून समाजात एकोपा, सद्भावना आणि संतांच्या विचारांचे महत्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन ग्रामस्थांनी एकत्र येऊन केले असून, यामुळे गावात सामाजिक ऐक्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0