गौतम सूर्यवंशी यांना पुरस्कार. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. ) सेलू : दि.26 रोजी सेलूच्या पेन्शनर्स असोसिएशनचा उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून यमुना गोविंद हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सेवा निवृत्तीनंतर सेवावृत्ती वर्धित करणारा पुरस्कार आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, लेखक व पेन्शनर्स असोसिएशनचे सभासद श्री.गौतम सूर्यवंशी यांनी येथील एका कार्यक्रमात केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ.विनायकराव कोठेकर सर हे होते.तर व्यासपीठावर श्री गौतम सूर्यवंशी, सौ.आशाताई सूर्यवंशी यांचेसह सर्वश्री.नागेश देशपांडे, डाॅ.गंगाधर गळगे, नारायणराव इक्कर, रवि मुळावेकर आदिंची उपस्थिती होती.सेलूच्या पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने दि.२६ मे रोजी सकाळी विसावा सभा गृहात आयोजित आम सभेच्या कार्यक्रमातील यमुना गोविंद पुरस्कार वितरण समारंभात श्री.सूर्यवंशी यांनी वरील प्रतिपादन केले.ते पुढे म्हणाले की,आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जडणघडणीत नूतन विद्यालय , महाविद्यालयाच्या पेन्शनर्स असोसिएशनचा वाटा आहे.आपल्याला देण्यात आलेला यमुना गोविंद उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार हा सेवाभावी वृतीचे दायित्व वाढविणारा आहे.असोसिएशनच्या विविध उपक्रमांचा गौरवपूर्ण उल्लेख करीत या सेवाकार्यात सभासदांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.यावेळी आपली औचित्यपूर्ण गीत रचनाही त्यांनी सादर केली.टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी रचनेला दाद दिली. पेन्शनर्स असोसिएशनच्या दिवंगत सभासद व देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री.टी.के. कुलकर्णी यांच्या प्रस्तावानुसार आदरांजली वाहून आमसभेस सुरूवात झाली. सचिव डाॅ. गंगाधर गळगे यांनी प्रास्ताविकात सेवानिवृत्त संघाच्या ध्येय धोरणांची माहिती देत सन २०२४ -२५ वर्षाचा अहवाल सादर केला.तर आर्थिक जमाखर्चाचा अहवाल, ताळेबंद व अंदाजपत्रक सहसचिव श्री.नारायणराव इक्कर यांनी सादर केले.सहसचिव श्री.रवि मुळावेकर यांनी गौरवपत्राचे वाचन केले.अध्यक्ष डाॅ.विनायक राव कोठेकर यांचे हस्ते गौतम सूर्यवंशी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व गौरवपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.अध्यक्षीय भाषणात डाॅ.कोठेकर यांनी सेवानिवृत्त संघाच्या उपक्रमशील वाटचालीचा व कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत श्री सूर्यवंशी यांच्या सेवाभावी वृत्तीची प्रशंसा केली .शेवटी उपाध्यक्ष श्री. नागेश देशपांडे यांनी आभार मानले. आम सभेस पेन्शनर्स असोसिएशनचे महिला पुरूष सभासद,कार्यकारी मंडळातील पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0