यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी पारोळा तालुक्यातील पिंप्री येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाची चौकशी करणार. यावल दि.२४ ( सुरेश पाटील ) जिल्ह्यातील मौजे पिंप्री प्र.उ. पारोळा येथील महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या गायरान जमीनीवरिल अतिक्रमण संदर्भात पिप्रि येथील गुलाब जगन्नाथ पाटील यांनी जळगाव जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) बी. एस.अकलाडे यांच्याकडे तक्रार केली होती त्यानुसार या प्रकरणाची चौकशी आता यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सौ.मंजुषी गायकवाड करणार आहेत.जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा.पं.) बी.एस. अकलाडे यांनी बुधवार दि.२१ मे २०२५ रोजी यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी सौ मंजुश्री गायकवाड यांना लेखी आदेशात नमूद केले आहे की, पिप्री प्र.उ. पारोळा येथील गुलाब जगन्नाथ पाटील यांनी दि.१४ मे २०२५ रोजी आत्मदहन निवेदन दिले आहे.निवेदनातील विषयात नमूद केले आहे की मौजे प्रिंप्री प्र.उ. पारोळा येथील महाराष्ट्र शासनाच्या मालकीची गायरान जमीन स.नं.४ व स.नं.८४ वर अनाधिकृत अतिक्रमणधारकांवर कारवाई करणेबाबत तसेच दाखल तक्रारीअर्जावर खोटा चौकशी अहवाल सादर करणा-यांवर कायदेशीर कारवाई करावी आणि यापुर्वीमाझ्या दाखल तक्रारी अर्जावर तात्काळ फेर चौकशी होवुन गायरान जमीनीवर अनाधिकृतअतिक्रमणधारकांवर कारवाई करावी.अन्यथा दि.२३ मे २०२५ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव यांच्या दालनासमोर आत्मदहन केले जाईल असे पत्र दिले होते त्यानुसार प्रस्तुत प्रकरणी सहा.गट विकास अधिकारी एंरडोल यांची नेमणुक करण्यात आली होती,परंतुसदरील अहवाल हा मोघम स्वरुपाचा दिशाभुल करणारा अहवाल सादर केला आहे असे तक्रारदार यांचे म्हणणेअसल्याने सदरील तक्रारींवर फेर चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.त्या अनुषंगाने गट विकास अधिकारी पंचायत समिती यावल यांची नेमणुकीची सुचना देण्यातआली.त्यानुसार आपणांस कळविण्यात येते की प्राप्त सुचनांनुसार गट विकास अधिकारी यावल यांचे अध्यक्षतेखाली स्थापन चौकशी समितीने नियमोचित चौकशी करुन संपुर्ण दप्तर आपल्या ताब्यात घेवुनवस्तुनिष्ठ चौकशी अहवाल आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह व पुरावे निशी आवश्यक ते कागदपत्रांसह दोन प्रतीत या कार्यालयास सादर करावा. आणि सदर चौकशी अहवाल सादर करण्यास विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी असे यावल गटविकास अधिकारी यांना दिलेल्या पत्रा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा.पं.) यांनी म्हटले आहे. याप्रमाणे आता यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी सौ. मंजुश्री गायकवाड चौकशी अहवाल केव्हा आणि कसा सादर करतात याकडे तक्रारदारांसह ग्रामस्थांचे लक्ष वेधून आहे.

यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी पारोळा तालुक्यातील पिंप्री येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाची चौकशी करणार.                                        
Previous Post Next Post