पाडळसा आरोग्य केंद्रामार्फत आरोग्य पथकाद्वारा डेंग्यू जनजागृती व मान्सूनपुर्व सर्वेक्षण. पाडळसा ता.यावल दि-24/05/2025गेल्या आठवड्यात अचानक वातावरणात बदल झाल्याने तापाच्या रुग्णांची तथा जलजन्य रोगाची संख्येत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.प्रमोद यशवंतराव सोनवणे यांच्या आदेशानुसार,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजु तडवी, तथा वैद्यकीय अधिकारी-डॉ.प्राजक्ता चव्हाण, डॉ.मोबशीर सैय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली...प्राथमिक आरोग्य केंद्र-पाडळसा अंतर्गत पाडळसा सह येणाऱ्या 18 गावामध्ये सर्व आरोग्य कर्मचारी व आशा सेविकांचे पथक तयार करून तापरोग व कंटेनर सर्व्हेक्षण, डासोत्पत्ती स्थानांचा सर्व्हे करण्यात येत आहे.सदरील तापरोग सर्वेक्षणा सोबतच दूषित पाण्यामुळे होणारे रोगांचा देखील सर्वे करून घेतला जात आहे.गावांत पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत सर्वेक्षण, त्यात व्हाल गळती, पाईप गळती, परिसर अस्वच्छ इत्यादी तपासणी करण्यात येत आहे,गावात तुंबलेल्या गटारी, वस्तीच्या किंवा स्त्रोतांचे ठिकाणचे शेणाचे उकिरडे उचलणे, डेंग्यू-हिवताप जनजागृती बाबत किंवा गावांत कोरडा दिवस पाळण्यासाठी दवंडी देणे, तसेच जलजन्य रोगाचा उद्रेक उदभऊ नये म्हणून, तोटी नसलेल्या नळांना तोट्या बसविणे, व्हॉल्व गळती, पाईपलाईन गळती दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याचे नियमित शुद्धीकरण करणे, आदी बाबतीत सर्व ग्रामपंचायीतांना पत्रकाद्वारे सूचना देण्यात आल्या.सदर सर्वेक्षणा प्रसंगी तालुका हिवताप पर्यवेक्षक-विजय नेमाळे, आरोग्य निरीक्षक-विजय देशमुख, हितेंद्र पाटील, स्वप्नील भालेराव, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अधिकारी-नीरज राणे यांच्या पर्यवेक्षण व देखरेख खाली...आरोग्य सेवक-नितीन पाटील, सतीश पवार, गिरीश जावळे, भरत धांडे, दिनेश बच्छरे, अनिकेत बोरसे, आशा सेविका-प्रगती पाटील, शारदा पाटील, पुष्पा पाटील आदीं सर्व आशा गटप्रवर्तक सर्वेक्षनाचे काम करीत आहेत.
byMEDIA POLICE TIME
-
0