मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान तालुकास्तरीय प्रतियोगिता पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात !! (पाडळसे प्रतिनिधी सुरेश खैरनार)मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा २ तसेच तालुकास्तरीय व्हिडिओ निर्मिती व नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ अंतर्गत पारितोषिक वितरण कार्यक्रम पंचायत समिती येथे नुकताच संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे,तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ.श्रीमती मंजुश्री गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी बी.के.पवार,गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके,पंचायत समिती शालेय पोषण आहार अधीक्षक सचिन मगर,माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष जयंत चौधरी,चंद्रकांत चौधरी,लीलाधर चौधरी,बबलू कोळी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यावल,सूर्यभान पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती यावल,मुन्नाभाऊ पाटील,गोटू सोनवणे,भरत चौधरी,तालुक्याचे सर्व शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख,शिक्षण विभाग व गट साधान केंद्राचे सर्व कर्मचारी इत्यादी मान्यवर तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक,पर्यवेक्षक, शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी,पंचायत समितीचे सर्व कर्मचारी व विविध शिक्षक संघटना पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे हे होते.सदरहू त्यांच्या हस्ते सरस्वती माता व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले.सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी खालील प्रमाणे बक्षीस व प्रमाणपत्र वितरण पार पडले.उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा या गटामध्ये:-प्रथम क्रमांक शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय साकळी ता. यावल,द्वितीय क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल भालोद ता.यावल,तृतीय क्रमांक आदर्श विद्यालय दहिगाव ता.यावल,शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा या गटामध्ये:-प्रथम क्रमांक जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा शिरसाड ता.यावल,द्वितीय क्रमांक पी.एम.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिगाव ता.यावल,तृतीय क्रमांक जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा किनगाव खुर्द ता.यावल तसेच तालुकास्तरीय व्हिडिओ निर्मिती व नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ परिसर अभ्यास या विषयात:-प्रथम क्रमांक श्रीमती कविता सुरेश चकोर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डोणगाव तालुका यावल,द्वितीय क्रमांक श्रीमती ज्योती गुलाबराव सनेर जिल्हा परिषद मुलांची प्राथमिक शाळा पाडळसे तृतीय क्रमांक दीपक वसंतराव चव्हाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाड तालुका यावल,सामाजिक शास्त्र या विषयात प्रथम क्रमांक:-श्रीमती अश्विनी योगेश कोळी भारत विद्यालय न्हावी तालुका यावल.जिल्हा परिषद जळगाव जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत प्रथम क्रमांक धीरज तायडे,सचिन धालपे,आसिफ तडवी,जगदीश माळी,मंगेश पाटील,पुष्पा तायडे कल्पना माळी सनेर उज्वला सोनार सोनाली कुलकर्णी,भोळे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश प्रमोद पाटील यांनी केले.
byMEDIA POLICE TIME
-
0