भोकरी येथील गोरगरीब गरजु कुटुंबाचे अतिक्रमित घरे नावावर करा, संविधान आर्मी चे जिल्हाअध्यक्ष अशोक अटकळे यांनी ग्रामपंचायतीना दिले निवेदन, रावेर प्रतिनिधी तालुव्यातील भोकरी येथील गोरगरीब गरजु कुटुंबाचे जे अतिक्रमित घरे गट क्र १५ मध्ये आहे अशी घरे लवकरच लवकर नावा वर करणयाची मागणी चे निवेदन आज दि २९ रोजी ग्रामपंचायतीला देणयात आले आहे,निवेदनावर म्हटले आहे की भोकरी येथील गट क्र १५ च्या हाद्धीतील २०११/पुर्वी चे अतिक्रमित कुटुंबाचे घरे भोकरी ग्रामपंचायतला नमूना ८ ला लावणे साठी वारंवार मागणी केली असता अघाप या वर काहीच तोडगा निघालेला नाही, तसेच २३/८/२०२४ रोजी अतिक्रमित नागरिकानी ग्रामपंचायतीला नावावर करणयासाठी अर्ज दिला असताना आजपावेतो सदरील जागा किंवा घरे नावावर झालेली नाही,गावातील अनुसुची जाती जमाती ,व शाहा समाज राहात असुन यांना घरा ची अत्यंत गरज आहे,तरी ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन सदरील जागेचा ठहराव मासीक सभा व ग्रामसभेत पारीत करुन मंजुर करावा व लवकरच लवकर ही अतिक्रमित घरे नावावर करा अशी मागणी चे निवेदन ग्रामसेवक,तिडके साहेब, यांना देणयात आले आहे या प्रसंगी संविधान आर्मी चे तालुका अक्ष्यक्ष तथा रावेर लोकसभा जिल्हाक्षयक्ष मा अशोक भाऊ अटकळे , यांच्यासह आमीन तडवी,असलम वस्ताद,सलीम तडवी,शरीफ तडवी,किशोर चौधरी धनराज लाहासे,मिलिंद लाहासे,आदि जण मोठया संख्याने उपस्थित होते

भोकरी येथील गोरगरीब गरजु कुटुंबाचे अतिक्रमित घरे नावावर करा, संविधान आर्मी चे जिल्हाअध्यक्ष अशोक अटकळे यांनी ग्रामपंचायतीना दिले निवेदन,                      
Previous Post Next Post