हात मदतीचा एक समाजहीतदक्ष उपक्रम.मिळणाऱ्या मदतीतून विद्यार्थ्यांनी ध्येय साध्य करावे _ तहसीलदार डॉ.शिवाजी मगर. ( शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.)केशवराज बाबासाहेब विद्यालयातील 51 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.सेलू : दि.27 जुन शुक्रवार रोजी शहरातील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील वसंतराव खारकर सभागृहातस्त्रीमुक्ती स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते लोक कल्याणकारी राजा छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील केशवराज बाबासाहेब विद्यालयात " हात मदतीचा " शैक्षणिक साहित्य वाटप सामाजिक उपक्रम तुमच्या आमच्या सहकार्याने या उपक्रमाचे उद्घाटन तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी नायब तहसीलदार मदन यादव , के डी वाघमारे, संयोजक सुनील गायकवाड,जेष्ठ वार्ताहर नारायण पाटील,उपेंद्र बेलूरकर ,अंकुश गुंजकर गटविकास अधिकारी जालना, मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके ,मुख्याध्यापक संजय धारासुरकर , अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका सचिव मंजुषा कुलकर्णी, अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका संघटक शुकाचार्य शिंदे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत ठाकूर,पि के शिंदे आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात राजश्री छत्रपती शाहू महाराज व हात मदतीचा उपक्रमाचे प्रेरनास्थान कै.दत्तात्रय हेलसकर यांच्या प्रतिमापूजनाने व दीप प्रज्वलाने तहसीलदार शिवाजी मगर यांच्या हस्ते करण्यात आले ते म्हणाले की हात मदतीचा उपक्रम सेलू शहरात हा अभिनव उपक्रम असुन या उपक्रमाच्या माध्यमातुन मागील 7 वर्षापासून कित्येक गरजु विद्यार्थ्यांना लाभ मिळालेला आहे या मिळालेल्या लाभातूनच विद्यार्थ्यांनी ध्येयापर्यंत जाण्यासाठी कसोटीने अभ्यास करावा आणि मिळणाऱ्या मदतीतून ध्येय साध्य करावे.तसेच या उपक्रमाचे संयोजक सुनील गायकवाड व सहकारी मित्रांचे अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमास शुभेच्छा देत पुढील कार्यक्रम याही पेक्षा मोठा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.तसेच या उपक्रमाचे संयोजक सुनील गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की मागील सात वर्षात 2612 विद्यार्थ्यांना लाभ मिळालेला असून याही वर्षी लोकसहभागा तून उपक्रमांतर्गत शहरातील व तालुक्यातील एकूण 6 शाळां मध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असून याही वर्षी 350 जवळपास विद्यार्थ्यांना मदत मिळणार आहे हा उपक्रम शहरातील दानशूर व्यक्तींचा आहे या उपक्रमास वाढता पाठिंबा पाहून आनंद होत आहे. केशवराज बाबासाहेब विद्यालयातील 51 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात आले.शुकाचार्य शिंदे यांनी जयंतीनिमित्त अभिवादन पर गीत सादर केले या गीतातून छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन चरित्र प्रकाश टाकला त्यांना साथ संगत सुमेध वाटूरे यांनी दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश ढवारे तर आभार मंजुषा कुलकर्णी यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अण्णासाहेब गायकवाड, विठ्ठल काळे,शाम मुंडे, बाबासाहेब बदाले, सदाशिव महाजन तथा शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला.
byMEDIA POLICE TIME
-
0