महावितरण(MSEB)चे देगलूर येथील कार्यालय नरसी ता.नायगाव येथे स्थलांतरित करा.* *वसंत सुगावे पाटील यांची मागणी*. नांदेड: *महावितरण(MSEB)* चे विभागीय कार्यालय, देगलूर येथील कार्यालय मध्यवर्ती ठिकाण म्हणून *नरसी ता.नायगाव* येथे महावितरण च्या स्वमालकीच्या जागेत स्थलांतरित करावे अशी मागणी *राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील* यांनी निवेदनाद्वारे महावितरण चे *अधीक्षक अभियंता यांच्याकडे* केली आहे. देगलूर महावितरण परिमंडळाच्या अंतर्गत नायगाव, बिलोली, धर्माबाद, मुखेड ही तालुके येतात परंतु कार्यालय देगलूर येथे असल्यामुळे या तालुक्यातील नागरिकांना, कर्मचाऱ्यांना कामे करत असताना अडचणी येत आहेत त्यामुळे कामांना विलंब होत असून यामध्ये डीपी दुरुस्ती, नवीन डीपी आणणे यामध्ये वेळ जात असून यामुळे महावितरण च्या ग्राहकांच्या, शेतकऱ्यांच्या कामांना वेळ लागत आहे.त्यामुळे महावितरण च्या विभागीय कार्यालया अंतर्गत येणारे नरसी ता.नायगाव हे गाव मध्यवर्ती ठिकाणी असून व याठिकाणी महावितरण ची स्वतः च्या मालकीची जागा आहे व नरसी येथे कार्यालय स्थापन केल्यास महावितरण च्या सोयी सुविधा जलदगतीने पुरवता येतील व कर्मचारी ,ग्राहकांना हि नरसी हे ठिकाण सोयीचे होईल त्यामुळे देगलूर येथील महावितरण चे कार्यालय नरसी ता.नायगाव येथे स्थलांतरित करावे अशी मागणी वसंत सुगावे पाटील यांनी केली आहे. यावेळी *राष्ट्रवादी काँग्रेसचे अभियंता सेल चे जिल्हाध्यक्ष बालाजी पा.सोमठाणकर,राष्ट्रवादी काँग्रेस चे बिलोली तालुकाध्यक्ष रणजित पा. हिवराळे,मुखेड* *तालुकाध्यक्ष बाबुराव कदम,धर्माबाद तालुकाध्यक्ष दिपक पा.चोळाखेकर,बिलोली पंचायत समितीचे मा.सभापती व्यंकटराव पांडवे,सभापती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धर्माबाद शहराध्यक्ष नरेश रेड्डी, बिलोली कार्याध्यक्ष गणेश शिंदे* *पाटील केसराळीकर,धर्माबाद तालुकाकार्याध्यक्ष नारायण पा.पवार, मुखेड शहर कार्याध्यक्ष जयभीम सोनकांबळे, मुखेड चे बालकी असद , कुंडलवाडी शहराध्यक्ष गंगाधर मर्कन्टे,बिलोली तालुका सचिव परमेश्वर निवळे,विश्वाबंर स्वामी मांजरमकर* आदी पदाधिकारी उपस्थित होते.धर्माबाद तालूका प्रतीनीधी सज्जन संतोष
byMEDIA POLICE TIME
-
0