*भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीत रक्षाबंधन*. (महेश निमसटकरतालुका प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.11:-स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दालनात आज (दि.११) ला रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपाध्यक्ष आश्लेषा शरदराव जि‌वतोडे व संचालक शांताबाई लटारी रासेकर यांनी संचालकांना तथा बाजार समितीचे सचिव व कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न केला.यावेळी संचालक ज्ञानेश्वर राजारामजी डूकरे, राजेंद्र गजानन डोंगे, प्रवीण बांदुरकर, कान्होबा लहारी तिखट, अनिल भानुदास चौधरी, मनोहर शत्रुघ्न आगलावे, शरद महादेव जांभुळकर, गजानन दिनाजी उताने, मोहन व्यक्टी भुक्या, राजु पुरुषोत्तम आसुटकर, श्यामदेव धनबा कापरे, विनोद बापुराव घुगुल, परमेश्वर सदाशीव ताजणे आदी उपस्थित होते.-------------------------------------यानिमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालकांनी मिळून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र शिंदे यांचा सत्कार केला.

भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीत रक्षाबंधन*.          
Previous Post Next Post