विवरे येथे पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकुळ सात जणाना चावा,गावात भितीचे वातावरण, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष (,रावेर तालुका प्रतिनिधी (जमील शेख) रावेर तालुव्यात विवरे गावातील गेल्या काही दिवसापासुन भटव्या कुत्र्यांचा धुमाकुळ मोठया प्रमाणावर सुरु आहे, मात्र अता या कुत्र्यात पिसाळलेल्या कुत्र्यांचा ही समावेश मोठया प्रमाणावर झाला असताना दिसत आहे,आज दि ११ रोजी विवरे गावातील बाजार चौकात पिसाळलेल्या कुत्र्यानी सात जणाना चावा घेतल्याने ते जखमी झाल्याची घटना नुकतेच घटली आहे,विशेष म्हणजे आज आठवडे बाजार ही होता, शेख जाबीर शेख रमजान,शेख सद्दाम शेख हुसैन,शेख रईस शेख कासम ,कलावंती हरिशचंद्र गाढे व इतर चार अशी जखमी चे नाव आहे,वारंवार मागणी करुन सुधा ग्रामपंचायत या कडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये संताप वक्त केला जात आहे,विवरे गावातील या भटव्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेतुन केली जात आहे,दर रोज शाळेतील विद्यार्थी जात असुन गावत भिती चे वातावरण निर्माण झाले आहे,
byMEDIA POLICE TIME
-
0