बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर दरोडा किव्वा रस्ता लुटच्या संशयावरून वाहनासह इंदोर येथील ४ जण पोलिसांच्या ताब्यात. १ फरार. ( यावल दि.६ ( सुरेश पाटील ) बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर तथा यावल चोपडा रस्त्यावर यावल पोलीस स्टेशन पासून एक ते दोन किलोमीटर अंतरावर एक वाहन क्रमांक नसलेली इरटीका कार मध्ये दरोडा किंवा रस्ता लुट करण्याच्या संशयीत पाच जण थांबलेले होते.शहराच्या बाहेर विरावली फाट्याच्या पुढे पोलिसांनी तेथे जावुन शिताफीने इंदोर येथील चौघांना पकडलेे तर एक जण अंधाराचा फायदा घेत फरार झाला.पोलिसांनी वाहन व दरोडा टाकण्यासाठी त्यांच्याकडे असलेले साहित्य हस्तगत केले आहे व यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अटक करण्यात आलेले चारही जण हे मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. बऱ्हाणपुर अंकलेश्वर या राज्य मार्गावरचोपडा रस्त्यावर किनगाव कडून यावलकडे मंगळवारी मध्यरात्रीनंतर एक संशयित वाहन यावलकडे येत असल्याची गुप्त खबर पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली होती.तेव्हा त्यांनी तातडीने सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे,पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन,पोलीस हवालदार सुनील पाटील,वसीम तडवी,अनिल साळुंखे, सचिन पाटील,मंगेश पाटील,ज्ञानेश्वर सपकाळे या पथकास खात्री करण्यासाठी पाठवले.पथक मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास यावल - चोपडा रस्त्यावर निघाले.दरम्यान विरावली फाट्याच्या पुढे अंधारात विना क्रमांकाची इरटीका कार रस्त्याच्या कोपऱ्यात लावलेली त्यांना दिसली तर एक जण रस्त्यावर पाळत ठेवुन असल्याचे दिसुन आले.पोलिस कारच्या दिशेने जात असतांना कार पळवण्याचा प्रयत्न चालकाने केला तर पाळत ठेवणाऱ्यास पकडण्यास पोलिस गेले असता तो अंधाराचा फायदा घेत फरार झाला.तेव्हा पोलिसांनी कारमध्ये हातात हत्यार तोंडावर काळ्या रंगाचा मास्क लावलेल्या सोहेल मकसूद खान वय २७ रा.खजराना इंदोर,मध्य प्रदेश परवेज अब्दुल गनी वय ३५ रा.चंदन नगर इंदोर,मध्य प्रदेश,इमरान अली शहजाद अली शाह वय ३६ रा.खजराना इंदोर,मध्यप्रदेश व मोहम्मद वसीम मोहम्मद रशीद वय ३४ रा.सरवटे रोड,इंदोर मध्य प्रदेश या चौघांना त्यांनी ताब्यात घेतले.तेव्हा या चौघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन करीत आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0