जागतिक आदिवासी दिनानिमित्त यावल येथे आदिवासी बांधवांचा मोठा जल्लोष. (यावल दि.९ (सुरेश पाटील)यावल शहरात आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांनी आपले पारंपारिक वेशभूषा धारण करून विविध कार्यक्रम,कला गुण सादर करीत मोठा जल्लोष केला.चोपडा,यावल, रावेर तालुक्यातील हजारो आदिवासी बांधवांनी आज यावल शहरात जागतिक आदिवासी दिनानिमित्त सहभाग नोंदविला.संपूर्ण शहरी भागासह ग्रामीण भागात जागतिक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कोरपावली गावातील प्रथम नागरिक, सरपंच आणि उपसरपंच, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य,सामाजिक, राजकीय पदाधिकारी,कार्यकर्ते, ग्राम विस्तार अधिकारि आणि गावातील सर्व ग्रामस्थ तसेच युवा पक्ष यांच्या उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आलात्याच प्रमाणे जवळच असलेल्या महेलखेडी गावातील तडवी वाड्यात बिरसा मुंडा चौकाचे अनावरण मार्केट कमिटीचे चेअरमन राकेश फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या वेळेस सर्व जातीय धर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते , तसेच यावल आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात शासकीय पद्धतीने जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमास रावेर विधानसभा मतदारसंघातील आमदार अमोलभाऊ जावळे व चोपडा यावल मतदार संघाचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत प्रामुख्याने उपस्थित होते.यावल चोपडा रावेर तालुक्यातील तडवी भिल्ल यांनी एकत्र येऊन मोठ्या संख्येने वेगवेगळ्या वेशभूषेत पोशाख परिधान करून एक अनोखा सांस्कृतिक उपक्रम सादर केले.यावेळी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते धनश्री चित्रमंदिर टाकीत रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होतेकार्यक्रमास यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व होमगार्ड बंदोबस्त चौख ठेवण्यात आला होता.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त यावल येथे आदिवासी बांधवांचा मोठा जल्लोष.                                                         
Previous Post Next Post