सौ रामकंवर द्वारकादास लड्डा सेमी विद्यालयाचे घवघवीत यश. (.मानवत / प्रतिनिधी.)————————. मानवत शहरातील सृजनशील, प्रयोगशील म्हणून ओळख असणारे सौ रामकंवर द्वारकादास लड्डा सेमी विद्यालयाचे तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. तर तालुक्यामध्ये सर्वात जास्त यश मिळवण्याचा मान राखत पाच खेळाडू जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेअपूर्वा अशोक निर्वळ ,पृथ्वीराज मेघराज शेंडगे, रिधान नरेंद्र कात्रुवार, प्रसाद विजय शिंदे, अक्षर नरेश गौड, विद्यार्थ्यांना कॅरम स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक विशाल धिंगे, यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या खेळाडूंचे पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. विजयकुमार कत्रुवार, उपाध्यक्ष मा. अनिलराव नखाते सचिव मा. बालकिशनजी चांडक, कोषाध्यक्ष रामचंद्रजी कत्रुवार, सहसचिव विजयकुमार दलाल, संस्थेचे सर्व संचालक, यांच्यासह मानवत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मनोज ताराचंद चव्हाण, केंद्रप्रमुख श्री. उमाकांत हाडुळे, तालुका संयोजक किशन भिसे, विद्यालयाचे शिक्षण सल्लागार पी एन बेले मुख्याध्यापक श्री. विश्वभूषण इंगोले, पर्यवेक्षक श्री विलास शिंदे, यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.***

सौ रामकंवर द्वारकादास लड्डा सेमी विद्यालयाचे घवघवीत यश.                                                                                    
Previous Post Next Post