सगरोळी सर्कलमध्ये डासांमुळे नागरिकांना हिवताप व डेंग्यू .. मारोती एडकेवार ज़िल्हा प्रतिनिधी/नांदेड नांदेड : बिलोली तालुक्यातील सगरोळी सर्कल मध्ये डासांचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढ झाले आहे, सगरोळी सर्कल मधील गावे, हे माळरान च्या पायथ्याशी असून. डासामुळे, अनेक नागरिक व शालेय विद्यार्थी,बिमार पडत आहेत, पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे. अनेक ठिकाणी डासांचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे, त्यामुळे अनेक नागरिकांना हिवताप, व डेंगू अशा रोगांशी तोंड द्यावे लागत आहे. यामुळे गाव तालुक्यातील ग्रामीण आरोग्य विभाग, या डासांच्या फवारणीसाठी लक्ष देतील का, हा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे. डास चावल्यानंतर,अनेक लहान मुलं यांना हिवताप, व डेंगू,सारखे रोग शरीरामध्ये निर्माण होत आहेत, व वृद्ध महिला व पुरुषांना सुद्धा डेंगू,व हिवतापेचा,या रोगाचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे, सगरोळी सर्कल मध्ये प्रत्येक गावामध्ये डासांची फवारणी करणे अत्यंत आवश्यक, असून आरोग्य विभाग मात्र याकडे लक्ष देत नाही, मोठ्या संख्येत डेंगू व हिवताप,चे रुग्ण शासकीय आरोग्य केंद्रात, व हॉस्पिटल व क्लिनिक, मध्ये मोठ्या संख्येने दिसून येत आहेत. यामुळे नागरिक हे परेशान आहेत, प्रत्येक गावच्या ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामविकास अधिकाऱ्याने, तरी पुढाकार घेऊन डास मारण्याची फवारणी करतील का? असे प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण होत आहेत.पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणीच्या साठा मोठ्या प्रमाणात, नाली व खड्ड्यामध्ये साचून असते. आणि झुडपे,व झाडीमध्ये मोठ्या, प्रमाणात हे डास आढळून येत आहेत, त्यामुळे ग्रामीण भागामध्ये डास मारण्याचे फवारणी करणे अत्यंत आवश्यकता,असून याकडे आरोग्य विभाग लक्ष देईल का हा नागरिकांना पडलेला मोठा प्रश्न असून,सगरोळी सर्कलमधील सर्व गावातील नागरिकाकडून प्रत्येक गावात डास, मारण्याची फवारणी आरोग्य विभागाने करावी, अशी विनंती नागरिकांमधून होत आहे.

सगरोळी सर्कलमध्ये डासांमुळे नागरिकांना हिवताप व डेंग्यू ..                                                                                
Previous Post Next Post