चिमुरकर यांच्या पुढाकाराने ४० महिला शेतकऱ्यांचे थांबलेले पैसे मिळाले परत. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती, दि.१० : तालुक्यातील ४० दुग्ध व्यवसायिक महिला शेतकऱ्यांनी अर्चना बावणे आणि निखील बावणे यांच्या मार्फत दि.०६ ऑगस्टला प्रविण चिमुरकर, सदस्य, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद चंद्रपुर यांचे कडे मराठवऱ्हाड मिल्क प्रोड्युसर कंपनी लि. महाराष्ट्र यांच्या विरूध्द लेखी तक्रार दिली. कंपनीने दि. ०१/०५/२०२५ ते १६/०५/२०२५ पर्यंत चे रूपये ८९,२२६ परत न केल्याचा आरोप केला होता. या तक्रारी संबंधित प्रविण चिमुरकर यांनी कंपनी चे चंद्रपूर जिल्हा प्रभारी आशिष शुक्ला आणि कंपनी सेक्रेटरी रोशन कालमेघ, नागपूर यांच्याशी संपर्क करून सखोल चौकशी केली. यातून महिला शेतकऱ्यांचे पैसे थांबविण्याचा अधिकार कोणालाही नाही असे सांगून दुग्ध व्यवसायिक महिला शेतकऱ्यांचे पैसे दोन दिवसात त्यांच्या खात्यात जमा करावे असे सांगितले. यावर कंपनी सेक्रेटरी रोशन कालमेघ, नागपूर यांनी त्वरित कारवाई करत दि.०८ ऑगस्टला तालुक्यातील ४० दुग्ध व्यवसायिक महिला शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले. महिला शेतकऱ्यांना न्याय मिळाल्यामुळे त्यांनी प्रविण चिमुरकर यांचे आभार मानले आहे.*चौकट :*शेतकऱ्यांनी त्यांच्यावर अन्याय होत असेल अथवा त्यांची फसवणूक होत असेल तर त्यांनी शांत बसू नये. अन्यायाविरुद्ध आवाज उठवलाच पाहीजे. शेतकऱ्यांना अडचणी असल्यास आमच्याकडे तसेच तालुका कृषीअधिकारी, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी यांचेशी संपर्क करावा.-सदस्य, प्रविण चिमुरकर, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, चंद्रपूर

चिमुरकर यांच्या पुढाकाराने ४० महिला शेतकऱ्यांचे थांबलेले पैसे मिळाले परत.                                                        
Previous Post Next Post