हिप्परगा थडी शाळमध्ये पर्यावरणपूरक रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम.एक पेड माॅ के नाम (,आनंद कुरुडवाडेनांदेड़ ग्रामीण प्रतिनिधि बिलोली) बिलोली.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिप्परगाथडी तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथे पर्यावरणपूरक रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम.एक पेड माॅ के नाम बंधुत्व, प्रेम आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम साधत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिप्परगाथडी (ता. बिलोली, जि. नांदेड) येथे रक्षाबंधनाचा सण उत्साहात आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात आला. या विशेष उपक्रमामुळे गावात आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.गावातील आदरणीय पुजारी हाणमंत अप्पा स्वामी यांच्या उपस्थितीत हा पवित्र सण साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना राख्या बांधून परस्परांतील आपुलकी, स्नेह आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा संदेश दिला गेला.या प्रसंगी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. नाईक सर, मुख्याध्यापक श्री. मुत्येपोड सर, श्री. सुर्यकांत गायकवाड सर, श्री. कोंडलवाडे सर, श्री. संजय गायकवाड सर, श्री. गौस सर, पत्रकार बंधू श्री. मारोतीराव एडकेवार, पर्यावरणप्रेमी शिक्षक व ‘सायकल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे शिक्षक सेनेचे बिलोली तालुका अध्यक्ष श्री. बालाजी गेंदेवाड सर तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.या प्रसंगी हणमंत अप्पा स्वामी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना राख्या, तर बालाजी गेंदेवाड सर यांच्या वतीने खाऊ देण्यात आला.राखी हा फक्त एक धागा नसून नात्यातील प्रेम, विश्वास आणि रक्षणाचे प्रतीक आहे. हिप्परगाथडी शाळेत साजऱ्या झालेल्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांना बंधुभावाबरोबरच निसर्गाचे रक्षण करण्याची जाणीवही दिली. पर्यावरणपूरक रक्षाबंधन साजरा करून शाळेने एक वेगळा आदर्श उभा केला आहे.या उपक्रमाअंतर्गत लावण्यात आलेल्या वृक्षाचे संरक्षण करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी सदरील वृक्षाला राखी बांधून घेतली आणि त्याचे रक्षण करण्याची शपथ सर्वांनी

हिप्परगा थडी शाळमध्ये पर्यावरणपूरक रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम.एक पेड माॅ के नाम                                         
Previous Post Next Post