*लोकमान्य विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन* *हर घर तिरंगा अभियान* (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती ) भद्रावती,दि.९:-येथील लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत २ ते ८ ऑगस्ट या पहिल्या टप्प्यांमध्ये वर्ग ५ ते ७ या वर्गासाठी तिरंगा या विषयावर वर आधारित पोस्टर स्पर्धा, वर्ग ८ ते १० साठी राखी तयार करणे ही कार्यशाळा, तर वर्ग ११ वी व १२ वी साठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. पोस्टर्स स्पर्धेत वर्ग ५ ते ७ च्या वर्ग खोल्यांमध्ये पोस्टर्स लावण्यात आले, तर राखी कार्यशाळा सभागृहामध्ये घेण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. तसेच मुलीच नाही तर मुले सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. जवळपास ४० राख्या विद्यार्थ्यांनी तयार केल्या. या कार्यशाळेला शिक्षिका कु. प्राजक्ता चिखलीकर व मिनाक्षी वासाडे यांनी मार्गदर्शन केले. रांगोळी स्पर्धा प्रा. कु.स्वाती गुंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यामध्ये इयत्ता अकरावी व बारावी कला व विज्ञान च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन तिरंग्यावर आधारित रांगोळी तयार केल्या.

लोकमान्य विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन*  *हर घर तिरंगा अभियान*                                                                            
Previous Post Next Post