धर्माबाद येथे ट्रक खांबावर आदळून दुकानात घुसला. घटना पहाटे चारची असल्याने अनर्थ टळला.. ( धर्माबाद (गजानन वाघमारे) येथील रामनगर चौक ते तेलंगाना बस स्थानकाच्या दरम्यान एका अशोक लेलँड ट्रकने पहाटे चारच सुमारास ट्रक वरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या उजव्या बाजूस असलेल्या पोलवर जाऊन ट्रक आदळला व बाजूच्या दुकानात घुसला परंतु दुकानात कोणी नसल्याने पुढील अनर्थ टळला आहे. अशी एक अजब घटना घडल्याने रस्त्यावरील दुकानदारात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, दिनांक सहा ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ४ वाजता धर्माबाद-बासर बायपास मार्गावरील रामनगर चौक परिसरात अशोक लेलँड (क्र. MH 28 BB 6446) या वाहनाचा भीषण अपघात झाला. नांदेडकडे जाणारे हे वाहन डाव्या बाजूने जात असताना अचानक भरधाव वेगामुळे नियंत्रण सुटले. दरम्यान वाहन रस्त्याच्या उजव्या बाजूस जाऊन पोलाला धडकले व थेट एका गोळी बिस्किट शॉपच्या सेटरमध्ये घुसले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाली आहे.सुदैवाने हा अपघात पहाटे चार च्या सुमारास झाल्याने रस्त्यावर गर्ना किंवा वर्दळ नसल्याने मोठा अनर्थ टळलाआ. वाहनचालक किरकोळ जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले आहे. धर्माबाद शहरवासी आणि शहरातील चौका चौकात स्पीड बेकची मागणी अनेकदा केली असून अद्यापही स्पीडब्रेकर होत नसल्याने असे एक्सीडेंट होत असल्याचे बोले जात आहे
byMEDIA POLICE TIME
-
0