.नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात खेळांडूचा सत्कार.. ( मानवत / बातमीदार. अनिल चव्हाण.)———————————————येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मानवत येथे विद्यालया मध्ये हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री संजयजी लाड , आणि उपमुख्याध्यापक श्री विश्वनाथ बुधवंत प्रमुख पाहुणे अशोकराव काळे सर, श्री अशोक बैस सर, क्रीडा शिक्षक श्री संजयजी जाधव, क्रीडा शिक्षक श्री.माणिकराव शिसोदे हे होते.यावेळी प्रथम मेजर ध्यानचंद आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडा दिना निमित्त माजी विद्यार्थी राष्ट्रीय खेळाडू यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यामध्ये माजी विद्यार्थी विद्यालयाचे तज्ञ गणित शिक्षक श्री.गणेशजी सिरसकर (मलखांब पट्टू राज्यस्तरीय खेळाडू ) श्री.बाळासाहेब दहे (महाराष्ट्र खो खो संघ प्रमुख) भाग्यश्री बाबुराव हाळनोर (अथलेटिक्स धावणे राज्यस्तरीय, स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक खोखो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक) अर्शिया शेख ( राज्यस्तरीय हँडबॉल ) यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. विश्वनाथ बुधवंत सर यांनी मेजर ध्यानचंद यांच्या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच गणेशजी सिरसकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले श्रीमती कुसूम कनकुटे मॅडम यांनी खेळा विषयी मनोगत व्यक्त केले तसेच श्री बाळासाहेब दहे यांनी शाळा व शिक्षक यांच्या विषयी कृतज्ञ व्यक्त करून खेळ या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सदाशिवराव होगे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार श्री माणिकराव सिसोदे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक बांधव श्री अशोक हरकाळ सर श्री सुरेश चव्हाण सर वाडकर सर पतंगे मॅडम, श्री भास्कर झोल यांची तसेच विद्यार्थीनी यांची प्रमुख उपस्थिती होती.**

नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात खेळांडूचा सत्कार..                                                                      
Previous Post Next Post